मोठी बातमी ! एकनाथ शिंदे गटाला फडणवीस सरकारचा पहिला झटका; त्या कामांना दिली स्थगिती
मोठी बातमी समोर येत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील तब्बल 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे. अनुभव नसताना कंपनीला साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे आता तानाजी सावंत यांच्या काळातील 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान जर एखाद्या गोष्टीत अनियमितता असेल तर तपासणी करणं क्रमप्राप्त असतं अशी प्रतिक्रिया यावर आताचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. अनुभव नसताना कंपनीला साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे ही स्थगिती देण्यात आली आहे.
दरम्यान यावरून आता शिवसेना ठाकरे गटानं सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तानाजी सावंत यांच्या आरोग्य मंत्रिपदाच्या कार्यकाळातील 3200 कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली, यावर प्रतिक्रिया देताना कैलास पाटील यांनी म्हटलं की, ज्यावेळी तानाजी सावंतांनी 3200 कोटीच्या कामांना मंजूर दिली, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात होते. ते उपमुख्यमंत्री होते, मग तेव्हा ते गप्प का होते? असा सवाल कैलास पाटील यांनी केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं कैलास पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील तब्बल 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे. अनुभव नसताना कंपनीला साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे ही स्थगिती देण्यात आली आहे. हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. मात्र यावरून आता विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. ज्यावेळी तानाजी सावंतांनी 3200 कोटीच्या कामांना मंजूर दिली, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात होते. ते उपमुख्यमंत्री होते, मग तेव्हा ते गप्प का होते? असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List