आनंदवार्ता! टपाल विभागात  21 हजार पदांसाठी मेगाभरती!! पोस्टमन ते सहाय्यक अधीक्षक पदांसाठी तरुणांना संधी

आनंदवार्ता! टपाल विभागात  21 हजार पदांसाठी मेगाभरती!! पोस्टमन ते सहाय्यक अधीक्षक पदांसाठी तरुणांना संधी

टपाल विभागात लवकरच पोस्टमन, ग्रामीण डाक सेवक (जीडीएस), मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस), सहाय्यक अधीक्षक अशी सुमारे 21 हजार 413 पदांची मेगाभरती होणार आहे. उमेदवार 3 ते 28 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. टपाल विभागाचे अधिकृत संकेतस्थळ indiapostgdsonline.gov.in वर अर्ज भरता येणार आहे. या मेगाभरतीमुळे रोजगाराची एक चांगली संधी तरुणांना मिळणार आहे.

देशात बेरोजगार तरुणांची संख्या वाढत असताना टपाल विभागाने काढलेल्या 21 हजारांच्या रिक्त पदांच्या भरतीमुळे या तरुणांना मोठी संधी प्राप्त होणार आहे. भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच दहावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषय अनिवार्य असले पाहिजेत. याशिवाय, उमेदवारांना संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे. मेगाभरतीसंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात दीड हजार जागा

ही भरती संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 3004, ओडिशा 1101, तामिळनाडू 2292, कर्नाटक 1135, आसाम 1870, गुजरात 1203, आंध्र प्रदेश 1215, पश्चिम बंगाल 923, बिहार 783, छत्तीसगड 638, झारखंड 822, पंजाब 400, हिमाचल प्रदेश 331 तर महाराष्ट्रात 1498 जागा भरणार आहेत.

लेखी परीक्षा होणार नाही

भरतीतील निवड प्रक्रिया ही गुणवत्तेवर आधारित असेल. परीक्षार्थींची कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवाराचे किमान 18 वर्षे पूर्ण तर कमाल वयोमर्यादा 40 वर्षांपर्यंत असावे. भरती नियमानुसार आरक्षित वर्गाला वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. एससी/एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट तर दिव्यांग उमेदवारांसाठी 10 वर्षांची सूट देण्यात आली आहे. उमेदवारांसाठी 100 रुपये अर्ज शुल्क आहे तर एससी/एसटी/महिला/दिव्यांगांना शुल्क नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हाय सिक्योरिटी नंबर प्लेटचे दर इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील जास्त का? थेट परिवहन आयुक्तांनी सांगितले कारण हाय सिक्योरिटी नंबर प्लेटचे दर इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील जास्त का? थेट परिवहन आयुक्तांनी सांगितले कारण
High Security Number Plate: महाराष्ट्रात हाय सिक्योरिटी नंबर प्लेटचे दर इतर राज्यांपेक्षा जास्त आहेत, असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून...
मोठी बातमी ! एकनाथ शिंदे गटाला फडणवीस सरकारचा पहिला झटका; त्या कामांना दिली स्थगिती
Champions Trophy – अफगानिस्तानचं स्वप्न धुळीस, दक्षिण आफ्रिकेची सेमी फायनलमध्ये धडक
नवीन कितीही शहरे बनवा, मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
बीडच्या संतोष देशमुख प्रकरणाबाबत प्रश्न विचारला; पंकजा मुंडे पत्रकारावरच संतापल्या
पोलीस असो की अधिकारी या गुन्ह्यात सापडला तर थेट बडतर्फीच, मुख्यमंत्र्यांचा पोलीस यंत्रणेला इशारा
तब्बल ८५ वर्षांनंतर राज्य परिवहन विभागाला कार्यालय मिळण्याचा मार्ग मोकळा, पाहा काय घडामोडी