ना शितली.. ना जयडी..; किरण गायकवाडला ‘लागीरं झालं जी’च्या टीमकडून लग्नाच्या भन्नाट शुभेच्छा
'लागीरं झालं जी', 'देवमाणूस' यांसारख्या मालिकांमधून अभिनेता किरण गायकवाड घराघरात पोहोचला. नुकताच त्याचा लग्नसोहळा पार पडला असून सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
किरण गायकवाडने वैष्णवी कल्याणकरशी लग्न केलंय. मालवणमध्ये अत्यंत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला. किरण आणि वैष्णवीच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच त्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
'लागीरं झालं जी'च्या टीमने किरणला लग्नाच्या अत्यंत हटके शुभेच्छा दिल्या आहेत. एखाद्या बॅनरप्रमाणे त्यांनी किरण आणि वैष्णवीचा हा पोस्टर एडिट केला आहे. त्यावरील मजकुराने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलंय.
'आमच्या येथे झी मराठी कृपेने देवमाणसाच्या आशीर्वादाने किरण आणि वैष्णवी यांना प्रेमाचे लागीर झालं जी... ना शितली, ना जयडी.. वैष्णवी होणार भैय्यासाहेबाची बायडी', असा मजकूर यावर लिहिलेला आहे.
किरण आणि वैष्णवीच्या लग्नाला 'लागीरं झालं जी' मालिकेतल्या कलाकारांचीही उपस्थिती होती. निखिल चव्हाण, सुमीत पुसावणे, महेश जाधव, अमरनाथ खराडे, राहुल मगदुम, पूर्वा शिंदे हे कलाकार या लग्नाला हजर होते.
किरण आणि वैष्णवीवर सध्या चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वैष्णवीसोबतच्या लग्नाआधी किरणचं दुसऱ्या मुलीशी अरेंज मॅरेज ठरलं होतं. मात्र त्यानंतर त्याला एका त्रासदायक अनुभवाला सामोरं जावं लागलं होतं. सहा महिने संपर्कात राहिल्यानंतर, दोन-तीनदा भेटल्यानंतर ती मुलगी डबल डेट करत असल्याचा खुलासा किरणसमोर आला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List