यापुढे सोडणार नाही..; ‘रामायणा’त सीता साकारणारी साई पल्लवी इतकी का भडकली?
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बिग बजेट चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता रणबीर कपूर यामध्ये प्रभू श्री राम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘रामायण’मध्ये सीतेची भूमिका साकारण्यासाठी साई पल्लवीने मांसाहार सोडून पूर्णपणे शाकाहार अवलंबल्याच्या चर्चांना उधाण आलंय. याच संदर्भातील वृत्त वाचून तिचा पारा चढला आहे. साईने संबंधित वृत्त शेअर करत त्यावर रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नव्हे तर तिने थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. एका तमिळ पब्लिकेशनने साई पल्लवीच्या शाकाहारबाबतचं वृत्त दिलं होतं.
एक्स अकाऊंटवर साईने लिहिलं, ‘बहुतेक वेळा, जवळजवळ प्रत्येक वेळी जेव्हा मी निराधार वृत्त/ अफा/ बनावट, खोटी किंवा चुकीची विधानं कोणत्याही हेतूने किंवा हेतुशिवाय (देव जाणो) पसरवल्याचं पाहते तेव्हा मी गप्पच राहणं पसंत करते. पण आता पुरे झालं. कारण हे सतत घडतंय आणि थांबण्याचं नाव घेत नाहीये. विशेषत: माझ्या चित्रपटांच्या रिलीज/घोषणा किंवा माझ्या करिअरमधील आनंददायी क्षणांच्या वेळीच हे घडतं. पुढच्या वेळी जर मला प्रतिष्ठित पेज किंवा मीडिया किंवा एखादी व्यक्ती गॉसिपच्या नावाखाली काहीही कथा पसरवताना दिसलं, तर तुम्हाला माझ्याकडून थेट कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. विषय संपला!’
Most of the times, Almost every-time, I choose to stay silent whenever I see baseless rumours/ fabricated lies/ incorrect statements being spread with or without motives(God knows) but it’s high-time that I react as it keeps happening consistently and doesn’t seem to cease;… https://t.co/XXKcpyUbEC
— Sai Pallavi (@Sai_Pallavi92) December 11, 2024
विशेष म्हणजे साई पल्लवी ही आधीपासूनच शाकाहारी आहे. एका मुलाखतीत ती याबद्दल व्यक्त झाली होती. “जर तुम्ही जेवणाबद्दल बोलत असाल तर मी कायम शाकाहारीच राहिले आहे. मी एखाद्याचं आयुष्य संपताना बघू शकत नाही. मी दुसऱ्यांना दुखावून ठीक आहे, ते याच लायकीचे आहेत असा विचार करू शकत नाही”, असं ती म्हणाली होती. दरम्यान रामाची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूरने मात्र या चित्रपटासाठी शाकाहार अवलंबल्याचं म्हटलं जातंय. मात्र त्यावर रणबीरने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
Sai Pallavi’s three values in Life
•I’m FOREVER VEGETARIAN, i can’t see if any life dies (She’s full Vegetarian since her childhood)
• I NEVER HURT ANYONE, I’ll put them before my EMOTIONS
• Daily Meditation@Sai_Pallavi92 #SaiPallavi pic.twitter.com/dBulgwNjwR
— Sai Pallavi FC (@SaipallaviFC) December 11, 2024
या चित्रपटात साई पल्लवी आणि रणबीर कपूसोबत अभिनेता सनी देओलचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने याचा खुलासा केला होता. “रामायण हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे कारण त्यांना तो ‘अवतार’ आणि ‘प्लॅनेट ऑफ द एप्स’ यांसारख्या बड्या चित्रपटांसारखा बनवायचा आहे. हा चित्रपट कसा असेल आणि त्यातील भूमिका कशा असतील याबद्दल लेखक आणि दिग्दर्शक खूप स्पष्ट आहेत”, असं तो म्हणाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List