पेसा भरतीवरुन तात्पुरता तोडगा, पेसा अंतर्गत भरतीचा विषय नेमका काय?

पेसा भरतीवरुन तात्पुरता तोडगा, पेसा अंतर्गत भरतीचा विषय नेमका काय?

मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावरुन संरक्षण जाळींवर उड्या मारणारे हे आंदोलनकर्ते साधेसुधे नाहीत. तर विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि सत्ताधाऱ्यांचेच आमदार आहेत. आदिवासींची पेगाअंतर्गत रखडलेली भरती आणि धनगरांना एसटीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवण्यासाठी सत्ताधारी आमदारांनीच सरकारची कोंडी केली. दादांचे आमदार झिरवाळ, राजेश पाटील, भाजपचे काशीराम पावरा, भाजपचे खासदार हेमंत सावरांनी थेट संरक्षण जाळीवरच उड्या घेतल्या. आमदारांनीच अशा प्रकारे उड्या घेतल्यानं मंत्रालयात खळबळ उडाली. काही वेळात पोलिसांनी या आमदारांना संरक्षण जाळीवरुन बाहेर काढलं. अशा प्रकारे उडी घेतल्यानं झिरवाळांची प्रकृती काहीशी बिघडल्याचं दिसलं.

या आंदोलनानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत तात्काळ बैठकही झाली. ज्यात पेसा भरतीवरुन तात्पुरता तोडगाही निघाला. सुरुवातीला कंत्राटी पद्धतीवर घेवून भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याचा निर्णय झाला. आता पेसा अंतर्गत भरतीचा विषय नेमका काय आहे. पंचायत एक्स्टेंशन टू शेड्युल एरिया अ‍ॅक्ट म्हणजेच पेसा अनुसूचित जमाती अर्थात ST कॅटेगरीतून आदिवासीच्या भरती प्रक्रिया होते.

2023 मध्ये सरकारनं 17 संवर्गातील तलाठी, शिक्षक अशा विविध साडे 8 हजार पदांची जाहिरात काढून भरती प्रक्रिया राबवून परीक्षा झाली आणि निवड याद्याही लागल्या. मात्र बिगर आदिवासी संघटनांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटमध्ये जाण्यास सांगितलं.

मात्र संघटनांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, त्यावर सरकारनं म्हटलं की, भरती प्रक्रिया स्थगित करत असून अंतिम निर्णय येईपर्यंत नेमणुका करणार नाही. सत्ताधारी आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या घेतल्यानं, विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला.

पेसा अंतर्गत भरतीवर कंत्राटी पद्धतीनं सरकारनं उतारा शोधला. मात्र धनगरांच्या एसटी आरक्षणाला विरोध करण्यावरुन पडळकरांनी या आदिवासी आमदारांच्या आंदोलनावरुन निशाणा साधला. मंत्रालयात उडी मारण्याच्या आणि आत्महत्येच्या प्रकाराच्या घटनेवरुनच संरक्षक जाळी बसवून उपाय शोधला…मात्र आता आमदारांनीच उड्या घेतल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पेसा भरतीवरुन तात्पुरता तोडगा, पेसा अंतर्गत भरतीचा विषय नेमका काय? पेसा भरतीवरुन तात्पुरता तोडगा, पेसा अंतर्गत भरतीचा विषय नेमका काय?
मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावरुन संरक्षण जाळींवर उड्या मारणारे हे आंदोलनकर्ते साधेसुधे नाहीत. तर विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि सत्ताधाऱ्यांचेच...
दयाबेनला बिग बॉसकडून मिळत होते तब्बल 65 कोटी, दिशा वकानी हिने तरीही…
पत्नीची ‘ही’ अवस्था पाहून अभिनेत्याने थेट घेतला हा अत्यंत मोठा निर्णय, कधीच आयुष्यात…
ठरलं! या तारखेला हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश
Mega Block News – मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर दहा तासांचा मेगाब्लॉक, अनेक गाड्या रद्द
Navratri Utsav 2024 – श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपरिक लमाणी पोषाखासह अलंकार परिधान