परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जाणार पाकिस्तानात, SCO बैठकीला लावणार हजेरी

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जाणार पाकिस्तानात, SCO बैठकीला लावणार हजेरी

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार आहेत. पाकिस्तानात होणाऱ्या शांघाय सहकारी संघटनेच्या बैठकीला जयशंकर हजेरी लावणार आहेत. यावेळी एससीओ बैठकीचे यजनमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. पाकिस्तानमध्ये 15-16 ऑक्टोबरला ही बैठक पार पडणार आहे.

पाकिस्तानकडे शांघाय सहकारी संघटनेच्या काऊन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंटचे अध्यक्षपद आहे. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पाकिस्तान दोन दिवसांची एसईओ हेड्स ऑफ गर्व्हरमेंट मीटींगचे यजमान पद भुषवणार आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये पाकिस्तानाने हिंदुस्थान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना या बैठकीचे निमंत्रण दिले होते.

पाकिस्तानाची राजधानी इस्लामाबादमध्ये ही बैठक होणार आहे. त्यापूर्वी पाकिस्तानच्या मंत्रिमंडळातले वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक होईल. एसीओ बैठकीत आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृति मुद्द्यावर चर्चा होईल. या बैठकीत हिंदुस्थानसह चीन, रशिया, कजाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझ्बेकिस्तान या देशांचाही समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दयाबेनला बिग बॉसकडून मिळत होते तब्बल 65 कोटी, दिशा वकानी हिने तरीही… दयाबेनला बिग बॉसकडून मिळत होते तब्बल 65 कोटी, दिशा वकानी हिने तरीही…
दयाबेन अर्थात दिशा वकानी हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. तारक मेहता मालिकेत दिशा वकानी ही...
पत्नीची ‘ही’ अवस्था पाहून अभिनेत्याने थेट घेतला हा अत्यंत मोठा निर्णय, कधीच आयुष्यात…
ठरलं! या तारखेला हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश
Mega Block News – मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर दहा तासांचा मेगाब्लॉक, अनेक गाड्या रद्द
Navratri Utsav 2024 – श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपरिक लमाणी पोषाखासह अलंकार परिधान
तरुणीला गुंगीचे औषध पाजून ब्लॅकमेल करणार्‍या बिल्डर पुत्राची निर्घृण हत्या, मुलीच्या मित्राने काढला काटा