पीडित चिमुकलीच्या आईने तक्रार केली, पुरावेदेखील दिले; 24 तासांनंतरही वामन म्हात्रेवर पोक्सोचा गुन्हा दाखल नाही

पीडित चिमुकलीच्या आईने तक्रार केली, पुरावेदेखील दिले; 24 तासांनंतरही वामन म्हात्रेवर पोक्सोचा गुन्हा दाखल नाही

एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. याबाबतचा एफआयआर मिंधे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे याने समाजमाध्यमावर व्हायरल केल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला. तशी तक्रारदेखील पोलीस ठाण्यात केली असून पुरावेसुद्धा दिले. मात्र 24 तास उलटले तरी अद्याप मुजोर वामन म्हात्रेवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे बदलापूर पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मिंधे सरकारच्या काळात पीडित कुटुंबाला न्याय मिळणार की नाही, मुलीचे नाव उघड करणाऱ्या म्हात्रेवर केव्हा कारवाई होणार, असा सवाल बदलापूरकरांनी केला आहे.

शाळेतील सफाई कामगारानेच दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आल्यानंतर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. त्यातील आरोपी अक्षय शिंदे हा सध्या तुरुंगात असून संबंधित शाळेचे अध्यक्ष व सचिव यांनाही पोक्सो लावण्यात आला आहे. ते दोघे कुठे राहतात, काय करतात याची माहिती पोलिसांना असूनही त्यांना पकडण्यास अपयश आले आहे. एकीकडे अध्यक्ष व सचिव फरार झाले असतानाच दुसरीकडे मिंधे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे याने न्यायालयाचे आदेश व सर्व संकेत पायदळी तुडवून ‘त्या’ घटनेची एफआयआर कॉपीच व्हायरल केली.

पीडितेचे व कुटुंबाचे नाव उघड केल्याने आणखी आमची बदनामी झाली असल्याचे मुलीच्या आईने म्हटले आहे. तिने तातडीने पोलीस ठाणे गाठून आमची व मुलीची बदनामी करणाऱ्या वामन म्हात्रेवर त्वरित पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी केली. त्याबाबतचे सर्व पुरावेदेखील पोलिसांना सादर केले, पण चोवीस तास उलटून गेले तरी म्हात्रे याच्यावर गुन्हा दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Narhari Zirwal: सत्ताधारी आमदारांनी मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या…काय आहे कारण Narhari Zirwal: सत्ताधारी आमदारांनी मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या…काय आहे कारण
Narhari Zirwal: राज्याच्या राजकारणात धक्कादायक बातमी आली आहे. सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी...
राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी मोर्चेबांधणी; विधानसभेपूर्वी कुणाला मिळणार आमदारकी? शिंदे गटाची नावं तर फायनल, भाजप, राष्ट्रवादीत कुणाची वर्णी?
Ashok Chavan : मलाही जिवंत ठेवा मी जिवंत राहिलो तर…माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काय बोलून गेले, वक्तव्याने एकच खळबळ
‘या’ नेत्याला अभिनेत्रींचं लैंगिक शोषण करण्याची सवय आणि…’, कॅबिनेट महिला मंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य
‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा हा स्पर्धेक ठरणार विजेता? अखेर ते नाव फिनालेच्या अगोदरच…
Govinda : गोविंदाला चालणं कठीण, व्हिलचेअरवरून घरी; पत्नी सुनीताने काय सांगितलं?
सूरज चव्हाण याच्यामुळे होणार बिग बॉसच्या घरातील ‘या’ सदस्यावर मोठा अन्याय?, लोकांमध्ये संताप, थेट…