‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा हा स्पर्धेक ठरणार विजेता? अखेर ते नाव फिनालेच्या अगोदरच…

‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा हा स्पर्धेक ठरणार विजेता? अखेर ते नाव फिनालेच्या अगोदरच…

बिग बॉस मराठी सीजन 5 चा फिनाले अवघ्या दोन दिवसांवर आलाय. 6 ऑक्टोबर 2024 रोजी बिग बॉसचा फिनाले होईल. बिग बॉसला त्याचे टॉप 6 फायनलिस्ट मिळाले आहेत. मुळात म्हणजे सुरूवातीपासूनच लोकांमध्ये या सीजनबद्दल मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, निकी तांबोळी, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर हे बिग बॉसच्या घरात आहेत. विशेष म्हणजे या सर्वांचाच बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम नक्कीच बघायला मिळाला. वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले. वर्षा उसगांवकर यांना बिग बॉसचे प्रबळ विजेतेपदाचे दावेदार म्हणून बघितले जात होते.

आता बिग बॉस मराठी सीजन 5 च्या फिनालेला अवघे दोन दिवस शिल्लक असताना बिग बॉसचा विजेता कोण होणार याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. अनेक दावे लोकांकडून केले जात आहेत. सूरज चव्हाण हाच बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता होणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात असलेल्या सदस्यांचा सुरूवातीपासूनचा त्यांचा प्रवास दाखवण्यात आलाय.

सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरातील सर्वात प्रामाणिक सदस्य असल्याचा लोकांचा दावा आहे. हेच नाही तर बऱ्याच वेळा सूरजच्या राहण्यावरून त्याच्या वागण्यावरून हेच नाही तर त्याच्या खाण्यावरूनही बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांनी त्याची मजाक उडवली. मात्र, सर्व गोष्टी त्याने अत्यंत संयमाने घेतल्याचे लोकांचे म्हणणे आहे. जवळपास सर्वच आठवड्यांमध्ये सूरज चव्हाण याला नॉमिनेशनमध्ये टाकले गेले.

प्रत्येक आठवड्यात नॉमिनेशनमध्ये टाकल्यानंतरही तो सुरक्षित राहिला. फिनाले विकला सुरूवात झाल्यानंतरही सूरज चव्हाण याने जेवताना अन्न डाईनिंग टेबलवर सांडल्याने अंकिता वालावलकर त्याच्यावर ओरडताना दिसली. त्यावेळी सूरज हा टेबल साफ करताना दिसला होता. यानंतर सूरज याच्यासाठी थेट निकी तांबोळी ही बोलताना दिसली.

निकी तांबोळी हिने थेट म्हटले होते की, आता किती दिवस राहिले आहेत नका ओरडू तुम्ही त्याच्यावर हवे तर मी साफ करते. त्यानंतर अंकिता हिच्यावर लोकांनी जोरदार टीका देखील केली होती. सूरज चव्हाण याला लोक मोठ्या प्रमाणात सपोर्ट करताना दिसत आहेत. सूरज चव्हाण हाच बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता होईल असे सातत्याने सांगितले जातंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेनेलिया डिसूजा हिने केला पती रितेश देशमुख याच्याबद्दल अत्यंत हैराण करणारा खुलासा, म्हणाली, मध्यरात्री त्याने… जेनेलिया डिसूजा हिने केला पती रितेश देशमुख याच्याबद्दल अत्यंत हैराण करणारा खुलासा, म्हणाली, मध्यरात्री त्याने…
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे नाव आहे. रितेश देशमुख हा बिग बॉस मराठी सीजन 5...
Bigg Boss Marathi 5 : भाऊ इज बॅक ! रितेश देशमुखची बिग बॉसमध्ये पुन्हा एंट्री , ग्रँड फिनालेआधी देणार मोठा धक्का
अंकिता वालावलकर हिच्यावर मोठा आरोप, घरातील सदस्यानेच…
Rakhi Sawant : स्मशानभूमीतून आईच्या अस्थीही घेतल्या नाही, राखीचे रडून रडून डोळे सुजले; भारतात येण्याची तडफड
रोज दाढी करणे धोकादायक आहे का? किती दिवसांतून दाढी करावी? तज्ज्ञांनी दिला असा सल्ला
दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित, पुणे सामूहिक बलात्कार प्रकरणी सुप्रिया सुळे यांची टीका
हिजबुल्लाहच्या उत्तराधिकाऱ्याचा खात्मा, इस्त्रायलने हवाई हल्ला करत केला मोठा दावा