महाभारतात द्रौपदीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री रुपा गांगुली यांना अटक, कारण काय?

महाभारतात द्रौपदीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री रुपा गांगुली यांना अटक, कारण काय?

बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या टीव्ही मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारणाऱ्या रुपा गांगुली (Rupa ganguly) यांनी अटक करण्यात आली आहे. त्या माजी राज्यसभा सदस्य आहेत. सध्या त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. स्थानिक महिला भाजप नेत्या रुबी दास यांच्या सुटकेच्या मागणीसाठी रुपा गांगुली या पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करत होत्या. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी पोलिसांच्या त्यांच्या सह इतर भाजप कार्यकर्त्यांना देखील अटक केली आहे. शाळकरी मुलाच्या मृत्यूच्या निषेधार्थ भाजप नेते आंदोलन करत होते. मुलाला पेलोडरची धडक बसली. कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कर्मचारी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी त्याचा वापर करत होते.

पोलीस स्टेशन समोर धरणं आंदोलन

भाजप कार्यकर्त्यांना अटक झाल्याची माहिती मिळताच रुपा गांगुली या दक्षिण कोलकाता येथील स्थानिक बांसद्रोणी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी दास यांच्या सुटकेची मागणी केली. पोलिसांच्या या कारवाई विरुद्ध त्या पोलीस स्टेशन समोरच धरणे आंदोलन करत होत्या.

रुपा गांगुली यांनी दावा केला की, दास आणि इतर भाजप समर्थक शांततापूर्ण आंदोलन करत असताना त्यांच्यावर स्थानिक तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलकांनाच अटक केली आहे.

शाळकरी मुलांच्या मृत्यूने संताप

रुपा गांगुली या रात्रभर धरणे आंदोलनाला बसल्या आणि अखेर गुरुवारी सकाळी १० वाजता कोलकाता पोलिसांनी त्यांना अटक केली. काही वेळातच त्याला पोलीस वाहनातून बांसद्रोणी पोलीस ठाण्याच्या आवारातून बाहेर नेण्यात आले. अटक केल्यानंतर गांगुली यांनी आरोप केला आहे की, पोलिसांनी त्यांना बॅगही घेऊ दिली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी गांगुली यांना अटक करण्यात आली आहे.

शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे. तृणमूल काँग्रेसच्या नगरसेवक अनिता कर मजुमदार या घटनेनंतर अनेक तास होऊन गेल्यानंतर ही पोहोचल्या नाही, त्यामुळे स्थानिक लोकं संतप्त झाले. रूपा गांगुली यांनी हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत काम केले आहे. ‘महाभारत’मध्ये साकारलेल्या द्रौपदीच्या भूमिकेने त्यांना घराघरात ओळख दिली. नंतर त्या भाजपमध्ये दाखल झाल्या आणि राज्यसभा सदस्यही राहिल्या आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष
तुमची  सकाळची एक चुक डोकं आणि मानेचा कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते. नवीन अभ्यासात असे आढळले आहे की दररोज ब्रश करणारे...
कोणी पैसे देत का पैसे! पाकिस्तानी खेळाडूंचे बेकार हाल, चार महिन्यांपासून पगारच मिळाला नाही
निवडणुकांच्या तोंडावर का होईना अखेर केंद्र सरकार झुकलं… मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
महामारीसाठी तयार रहा, काळजी वाढवणारा निती आयोगाचा अहवाल
अखेर आज तो सुदिन अवतरला; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; राज्यातील नेते काय म्हणाले?
महाभारतात द्रौपदीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री रुपा गांगुली यांना अटक, कारण काय?
शिवतीर्थावर आवाज शिवसेनेचाच! पालिकेकडून मेळाव्यासाठी रीतसर परवानगी, उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार