एसटीतून फिरणारे आबा मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘हा’ अभिनेता साकारणार गणपतराव देशमुख

एसटीतून फिरणारे आबा मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘हा’ अभिनेता साकारणार गणपतराव देशमुख

महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या प्रभावीशाली ठसा उमटवणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये आवर्जून उल्लेख करावा असं नाव म्हणजे सांगोल्याचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख… अत्यंत साधी राहणी असणारे नेते, अशी त्यांची ओळख… सलग 11 वर्षे सांगोला विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले. शेतकरी कामगार पक्ष पश्चिम महाराष्ट्रात रूजवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. गणपतराव आबांना जाऊन आता तीन वर्षे झाली. पण त्यांच्या कामाचा उल्लेख सांगोल्याच्या राजकारणात होत राहतो. एसटीतून फिरणारे आबा आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर ‘कर्मयोगी आबासाहेब’ हा सिनेमा येत आहे. या सिनेमात अभिनेता अनिकेत विश्वासराव गणपतराव देशमुख यांची भूमिका साकारणार आहे.

वारकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तब्बल 55 वर्षं त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्वं केलं. सांगोल्याचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांचं जीवन आणि कार्य आता चित्रपटातून उलगडणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेला ‘कर्मयोगी आबासाहेब’ हा चित्रपट 25 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी आणि हिंदी भाषेत हा सिनेमा जगभर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच लाँच करण्यात आलं.

आबांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दिसणार

आबासाहेब यांनी राज्याच्या राजकारण, समाजकारणात महत्त्वाचं योगदान दिलं. तब्बल 11 वेळा ते आमदार झाले. त्यात दोनवेळा कॅबिनेट मंत्रीपद भुषवण्याची संधी त्यांना मिळाली. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजासाठी योगदान देणाऱ्या, आपल्या भागाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या, शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा वेध चित्रपटातून घेण्यात आला आहे. त्यामुळे आबासाहेबांना चित्रपटातून पुन्हा एकदा पाहण्यासाठी आता 25 ऑक्टोबरपर्यंत थांबावं लागणार आहे.

कलाकार कोण- कोण झळकणार?

‘कर्मयोगी आबासाहेब’ या चित्रपटात दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारली आहे. अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), अहमद देशमुख, वृंदा बाळ, निकिता सुखदेव, अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कार्यकारी निर्माता अमजद खान शेख असून प्रोडक्शन कंट्रोल सय्यद दादासो शेख यांनी काम पाहिले आहे.

मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती तुळशीराम बनकर, बाळासाहेब महादेव एरंडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचं लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी निभावली आहे. कुणाल गांजावाला, मनीष राजगिरे यांनी गाणी गायली आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजपमधील बडा नेता शरद पवार गटाच्या मार्गावर, पुणे जिल्ह्यात पक्षाला बसणार धक्का भाजपमधील बडा नेता शरद पवार गटाच्या मार्गावर, पुणे जिल्ह्यात पक्षाला बसणार धक्का
विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाला धक्का बसणार असल्याची चिन्ह आहेत. भाजपचे पुणे जिल्ह्यातील माजी मंत्री कमळ...
‘अनुपमा’च्या ‘काव्या’कडून रुपाली गांगुलीवर धक्कादायक आरोप; म्हणाली ‘ती दुतोंडी..’
‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरज चव्हाणने सांगितला लग्नाचा प्लॅन
निक्की तांबोळीने सूरजला दिला शब्द; म्हणाली, मी जिंकली तर ट्रॉफी…
तुमच्याकडून ही अपेक्षा नाही..; महात्मा गांधींबद्दल ‘लक्ष्मण’ यांचं वक्तव्य ऐकून नेटकरी नाराज
जादू की झप्पी आणि पप्पी कुणाला? गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’मध्ये जाणार; डंके की चोट पर घेणार मानधन
विधानसभेवेळीच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा