गोविंदाला गोळी लागण्यामागे कट-कारस्थान? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले..

गोविंदाला गोळी लागण्यामागे कट-कारस्थान? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले..

बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने अभिनेता गोविंदा मंगळवारी पहाटे जखमी झाला. गोविंदाच्या डाव्या पायाला बंदुकीची गोळी लागली. मुंबईतल्या क्रिटीकेअर रुग्णालयात गोविंदावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर विविध सेलिब्रिटींनी रुग्णालयात गोविंदाची भेट घेतली. दिग्दर्शक डेविड धवन, भाचा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह यांनी रुग्णालयात जाऊन गोविंदाच्या तब्येतीची विचारपूस केली. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा, निर्माता जॅकी भगनानी, कॉमेडियन सुरेश लहरी यांनीसुद्धा गोविंदाची भेट घेतली. यावेळी रुग्णालयाबाहेर माध्यमांशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया दिली.

“त्याची प्रकृती आता स्थिर आहे. तो ठीक आहे. हा एक अपघात होता. अपघातात जर-तरच्या गोष्टी नसतात. त्याच्यावर उपचार सुरू आहेत”, असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. ही प्रतिक्रिया देत त्यांनी या घटनेत घातपाताची किंवा कट-कारस्थानची शक्यता नाकारली आहे. गोविंदाच्या पायाला बंदुकीची गोळी लागलीच कशी, असा सवाल चाहत्यांनी उपस्थित केला होता. ही गोळी चुकून लागली की यामागे काही वेगळं कारण आहे, असेही प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

गोविंदाच्या स्वत:च्याच रिव्हॉल्वरमधून ही गोळी सुटली आणि त्याच्या पायाला लागली. या घटनेनंतर पोलिसांनी गोविंदाची रिव्हॉल्वर जप्त केली असून याप्रकरणी त्यांनी त्याचा जबाब नोंदवला आहे. गोविंदा कोलकात्यासाठी घरातून निघत होता, तेव्हा ही घटना घडली. यावेळी घरात त्याची पत्नी सुनितासुद्धा उपस्थित नव्हती. ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सुनिताने सांगितलं, “डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंदाची प्रकृती आता स्थिर आहे. मी सध्या मुंबईबाहेर आहे. याबद्दलची माहिती मिळताच मी इथून निघाले आहे. इथून थेट मी रुग्णालयात जाणार आहे.”

गोविंदाला गोळी कशी लागली?

मंगळवारी गोविंदा सकाळी 7 वाजताच्या सुमारास विमानाने कोलकात्याला जाणार होता. घरातून निघत असताना तो बंदूक कपाटात ठेवत होता. त्यावेळी हातातून बंदूक खाली पडली आणि बंदुकीतून एक गोळी सुटली. ती गोळी थेट गोविंदाच्या पायाला लागली. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ही गोळी बाहेर काढली असून गोविंदाची प्रकृती आता स्थिर आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अमित शहांना स्वप्नदोष झाला आहे – संजय राऊतांचा टोला अमित शहांना स्वप्नदोष झाला आहे – संजय राऊतांचा टोला
अमित शहांना स्वप्नदोष झालाय, याला स्वप्न दोष म्हणतात. संपूर्ण भारतीय जनता पक्षालाचा स्वप्नदोषाचा विकार जडला आहे. अमित शाह हे देशाचे...
चलो मुंबई… हेच का अच्छे दिन?; शिंदे सरकारच्या विरोधात संभाजीराजे मोर्चा काढणार
Govinda Health Update: स्वतःच्या पायावर कधी उभा राहणार गोविंदा? कशी आहे अभिनेत्याची प्रकृती?
हृतिक रोशनचं झालंय दुसरं लग्न? पोस्ट पाहून चाहते चकीत, पहिली पत्नी म्हणाली…
गोविंदाला गोळी लागण्यामागे कट-कारस्थान? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले..
थिएटरमध्ये अरबाज खानला पत्नीने सर्वांसमोर केलं किस; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव
जेव्हा आरशात मी चेहरा पाहिला…; महिमा चौधरीने सांगितली त्या भीषण अपघाताची आठवण