भाजपमध्ये मोठं काहीतरी घडतंय, अमित शाह मुंबईत, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना हुंकार, रात्री खलबतंही होणार

भाजपमध्ये मोठं काहीतरी घडतंय, अमित शाह मुंबईत, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना हुंकार, रात्री खलबतंही होणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष चांगलाच कामाला लागला आहे. भाजपचे महाराष्ट्रातील नेते विधानसभा निवडणुकीची तयारी करत असतानाच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील महाराष्ट्राकडे विशेष लक्ष देत आहेत. महाराष्ट्र म्हणजे भाजपसाठी सारं काही आहे, अशाप्रकारचं लक्ष अमित शाह यांच्याकडून राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे दिलं जात आहे. महाराष्ट्र खास असण्यामागे अनेक कारणंदेखील आहेत. कारण महाराष्ट्राच्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीसारखा पराभव पदरात पडला तर ते भाजपला परवडणारं नाही. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी अमित शाह स्वत: भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. अमित शाह सातत्याने महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.

अमित शाह आज मुंबई, ठाणे इथल्या भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे अमित शाह यांच्या उपस्थितीत आज रात्री सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. अमित शाह हे गेल्या दोन आवड्यात दुसऱ्यांदा राज्यात आले आहेत. याआधी ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आले होते. त्यानंतर काही दिवसांनी ते नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या दौऱ्यासाठी आले होते. यानंतर लगेच काही दिवसांनी ते पुन्हा मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा यावेळी दोन दिवसांचा दौरा असल्याची माहिती मिळत आहे.

अमित शाह संघ शाखेलाही भेट देणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या आजच्या दौऱ्याला विशेष महत्त्त्व आहे. अमित शाह महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. शाह हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून यावेळी ते कोपरखैरणेतील संघ शाखेलाही भेट देणार आहेत. संघ प्रचारकांसोबत शाह 1 तास चर्चा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि संघ यांच्यातील समन्वयासाठी विधानसभा संयोजक नेमले गेले आहेत. त्यामुळे अमित शाह यांच्या या दौऱ्यात ते संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा करणार आहेत.

फडणवीस यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

दरम्यान, अमित शाह यांच्या उपस्थितीत आज दादरमध्ये भाजपचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कार्यकर्त्यांना सूचना केल्या. “अति विश्वास ठेवू नका आणि गाफील राहू नका, असा कानमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी दिला. “आपले विरोधक एकत्रित आले आहेत. ते कुठलीही तडजोड करायला तयार आहेत. सरकारने केलेल्या कामांमुळे लोक आपल्यासोबत आहेत. ३ कोटींहून अधिक लाभार्थी सरकारचे आहेत. त्यांची मते मिळाली तरी सरकार पुन्हा येईल”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. “उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलेला आहे. मराठी आणि हिंदू मते सोबत नसल्याने त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचत आहेत. आपलेच सरकार येईल, अशी परिस्थिती सध्या आहे. पण अती आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका”, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कार्यकर्त्यांनी काय-काय करायचं? अमित शाह यांनी मुंबईतल्या मेळाव्यात आखला प्लॅन, भाजपने शड्डू ठोकला कार्यकर्त्यांनी काय-काय करायचं? अमित शाह यांनी मुंबईतल्या मेळाव्यात आखला प्लॅन, भाजपने शड्डू ठोकला
महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शड्डू ठोकला आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक ही...
‘त्यावेळी’ महाराष्ट्रात फक्त भाजपचंच सरकार येणार, अमित शाह यांचं मोठं विधान
बिग बॉस होस्ट करण्यासाठी या दिग्गज मराठी अभिनेत्याला होती ऑफर, का दिला नकार?
पंढरीनाथ कांबळे घरातून बाहेर येताच म्हणाला, निक्की-अरबाजची फालतुगिरी…
विदर्भाच्या विकासाची नितीन गडकरींनी केली पोलखोल, मोठे गुंतवणूकदार येत नसल्याची दिली कबूली
लेबनानमधील पेजर स्फोटानंतर आता इराणला iPhone स्फोटाचा धोका!
Bangkok मध्ये मोठी दुर्घटना; टायर फुटल्याने स्कूल बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती