लालबाग राजा गणपतीचा 1934 पासून 2024 पर्यंतची मूर्ती असणारा व्हिडिओ व्हायरल

लालबाग राजा गणपतीचा 1934 पासून 2024 पर्यंतची मूर्ती असणारा व्हिडिओ व्हायरल

गणेशोत्सवाची धामधूम गेल्या दहा दिवसांपासून सुरु होती. आता पुढच्या वर्षी लवकर या…च्या गजरात गणरायाचे विसर्जन झाले. पुणे, मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातील भाविकांची गर्दी झाली. मानाचे गणपती आणि प्रसिद्ध गणपती पाहण्यासाठी तासनतास रांग लावून भाविक थांबले होते. मुंबईतील लालबागच्या राजाचे आकर्षण मुंबईकरांनाच नाही तर राज्यातील सर्व भाविकांना होते. अनेक दिग्गज अन् सेलिब्रिटी लालबाग राजाचे दर्शन घेतात. त्याचवेळी लालबागच्या राजाच्या गणपतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत गणपतीच्या स्थापनेपासून 2024 पर्यंत असणाऱ्या सर्व मूर्ती दाखवण्यात आल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

असा आहे इतिहास

लालबागच्या राजाची स्थापना १९३४ मध्ये करण्यात आली. त्या ठिकाणी असलेला बाजार कायम राहावा त्यासाठी त्या ठिकाणी असलेला कोळी व इतर व्यापाऱ्यांनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती झाली. त्यानंतर लालबागचा राजा गणपतीची कीर्ती सर्वत्र होऊ लागली. नवसाला पावणारा हा गणपती आहे, अशी प्रसिद्धी झाली. त्यावेळचे शामराव विष्णू बोधे, नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही.बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु.ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यानंतर १९३४ मध्ये ‘श्री’ची स्थापना झाली.

लालबागच्या राजाचे मंडळ गणरायाच्या मूर्तीस निरनिराळया नेत्यांची रुपे दिली होती. १९४६ साली गणरायाची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेषात दाखवण्यात आली. १९४७ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या वेषात श्रीची मूर्ती होती. १९४८ महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत मूर्तीचे रूप साकारले होते.

मूर्तीसाठी अशी होते तयारी

लालबागच्या राजाची मूर्ती मुंबईत सर्वात उंच मूर्ती असते. शेकडो मूर्तीकार ही मूर्ती तयार करतात. मूर्तीकार गणरायाचे वेगवेगळे भाग तयार करतात. त्यानंतर ते जोडले जातात. मूर्ती जोडण्यापूर्वी एक विशेष पूजा केली जाते. गणपतीच्या पायाची ही पूजा असते. गणपती मंडळाचे सदस्य आणि मूर्तीकार या पूजेत सहभागी होतात. पूजा झाल्यावर मूर्तीला रंगकाम केले जाते. त्यानंतर सजावट केली जाते. राजाचे मांडव सजवण्याची जबाबदारी मोठ्या आर्ट डायरेक्टवर सोपवली जाते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी ! मनोज जरांगे हेच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; कुणी केली ही घोषणा? मोठी बातमी ! मनोज जरांगे हेच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; कुणी केली ही घोषणा?
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट समाजातील विविध नेते घेत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू राजरत्न आंबेडकर...
सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आहे ही मराठमोळी अभिनेत्री, लग्न करण्यापूर्वी ठेवली होती ही अट
‘बिग बॉस मराठी सीजन 5’च्या निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप, थेट सूरज चव्हाणला..
Ind Vs Ban Test Series 2024- आमची 100 धावांवर बाद होण्याची तयारी होती…; रोहित शर्मा स्पष्टचं बोलला
फडणवीसांच्या पोस्टरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो ताटातील चटणीसारखा, अंबादास दानवे यांचा जबरदस्त टोला
सुंदर संतती प्राप्तीसाठी वहिनी दिरासोबत पळाली, पतीची पोलिसात धाव
दसर्‍याच धुणे धुण्यासाठी गेलेल्या पतीचा तलावात बुडून मृत्यू, पत्नीला वाचविण्यात नागरिकांना यश