मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात या तारखेपासून बदल, पाहा काय घेतला निर्णय

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात या तारखेपासून बदल, पाहा काय घेतला निर्णय

मध्य रेल्वेने आपल्या लोकल ट्रेनचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे वेळापत्रक 5 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. यात वेळापत्रकात छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणाऱ्या 10 जलद लोकलना दादर स्थानकातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इतर लोकलचे देखील वेळापत्रक बदलणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसचा भार कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने सीएसएमटीहून सुटणाऱ्या आणि सीएसएमटीत प्रवास संपणाऱ्या दहा लोकलना ( 10 अप आणि 10 डाऊन ) दादर स्थानकात शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या लोकल आता दादरवरुन सुटतील आणि दादरला त्यांचा प्रवास समाप्त होईल असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत सीएसएमटी स्थानकाबाहेर अनेकदा लोकल ट्रेन फलाट रिकामा होण्याची वाट पाहात उभ्या असतात. त्यामुळे प्रवाशांचा नाहक वेळ जातो. त्यातच सीएसएमटीत 254 जलद लोकल सुटतात किंवा त्यांचा प्रवास संपत असतो. परंतू फलाटांची संख्या मर्यादीत असल्याने लोकल उभ्या राहतात , त्यामुळे सीएसएमटीतील जलद लोकलची संख्या कमी करुन दहा जोडी ट्रेन सीएसएमटीहून दादर स्थानकात शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकलची ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारेल आणि सीएसएमटी येथील लोकलचा प्रतीक्षा वेळ कमी होईल असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

प्रवाशांची सोय होणार, 5 ऑक्टोबरपासून बदल

या निर्णयाने सीएसएमटी येथील गर्दी कमी होऊन दादर येथील प्रवाशांना जादा गाड्या उपलब्ध होतील आणि दादर येथील गर्दीवर उतारा मिळेल असे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. या महत्वाच्या बदलासह काही लोकलचा विस्तार देखील करण्यात येणार आहे. तर अनेक ट्रेनच्या नेहमीच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. या नवीन संभाव्य बदलामुळे प्रवाशांची सोय होईल आणि एकूण लोकलच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल. मध्य रेल्वे आता 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या बदलांची तयारी करत असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कार्यकर्त्यांनी काय-काय करायचं? अमित शाह यांनी मुंबईतल्या मेळाव्यात आखला प्लॅन, भाजपने शड्डू ठोकला कार्यकर्त्यांनी काय-काय करायचं? अमित शाह यांनी मुंबईतल्या मेळाव्यात आखला प्लॅन, भाजपने शड्डू ठोकला
महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शड्डू ठोकला आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक ही...
‘त्यावेळी’ महाराष्ट्रात फक्त भाजपचंच सरकार येणार, अमित शाह यांचं मोठं विधान
बिग बॉस होस्ट करण्यासाठी या दिग्गज मराठी अभिनेत्याला होती ऑफर, का दिला नकार?
पंढरीनाथ कांबळे घरातून बाहेर येताच म्हणाला, निक्की-अरबाजची फालतुगिरी…
विदर्भाच्या विकासाची नितीन गडकरींनी केली पोलखोल, मोठे गुंतवणूकदार येत नसल्याची दिली कबूली
लेबनानमधील पेजर स्फोटानंतर आता इराणला iPhone स्फोटाचा धोका!
Bangkok मध्ये मोठी दुर्घटना; टायर फुटल्याने स्कूल बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती