सोडून गेले त्यांची बायकोही निवडून आली नाही; गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना खोचक टोला

सोडून गेले त्यांची बायकोही निवडून आली नाही; गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना खोचक टोला

जळगावातील जामनेर येथील भाजपाचे नेते दिलीप खोडपे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रवादीची तुतारी वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. खोडपे यांनी जामनेरमधून गिरीश महाजन यांच्या विरोधात उभे करण्याचा शरद पवार यांची योजना असल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात नांदेड येथे आलेल्या भाजपाचे मंत्री गिरीश महाजन आणि अशोक चव्हाण यांच्या हस्ते माजी खासदार चिखलीकर यांच्या घरातील गणरायाची आरती करण्यात आली. त्यावेळी गिरीश महाजन यांनी पक्ष हा पक्ष असतो. लोक येत जात असतात. घोडा मैदानजवळ आहे अशा शब्दात गिरीश महाजन यांनी टोला लगावला आहे.

गिरीश महाजन पुढे म्हणाले की खडसेंचा ही खूप मोठा प्रवास होता.ते गेले काय राहीलं त्यांचं,काहीच राहिलं नाही. जे पक्ष सोडून गेले नाहीत. त्यांच्या पत्नीसुद्धा निवडून आल्या नाहीत दूध डेअरीमध्ये,आमचे चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण ते त्या ठिकाणी जाऊन उभे राहिले. 150 किलोमीटर लांब जाऊन त्यांच्या मतदारसंघात. आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी खडसे वहिनींचा पराभव केला. त्या दूध डेअरीच्या चेअरमन होत्या.जिल्हा बँकेवर त्यांचं काही राहिलं नाही.विधानसभेला त्यांच्या कन्या देखील पडल्या आहेत. पक्ष हा पक्ष असतो, कोण येतं, जातं हे चालू राहणार आहे, ज्यांना आजमवायचयं त्यांनी आजमावावे असाही टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

मैत्रीपूर्ण लढत कुठे होणार नाही

महामंडळ वाटपात शिंदे यांच्या गटाला प्राधान्य दिले गेले आहे. याबद्दल ते म्हणाले की हा विषय पक्षश्रेष्ठी बघतात मला वाटतं देवेंद्रजींना हा विषय माहीत असेल. भरत गोगावले यांना संधी मिळालेली नाही. याबाबत ते म्हणाले  की बरोबर आहे, येत्या पंधरा – वीस दिवसात आचारसंहिता लागणार आहे मंत्रीपद मिळून करणार काय, पुढच्या मंत्रिमंडळात ते पहिल्यांदा शपथविधी घेतील असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. मनसे नेते अमित ठाकरे विधानसभेत निवडणूक लढविणार आहेत. याबदद्ल विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की चांगलं आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे. मला वाटतं ते निवडणूक लढवतात त्यात वावगं काय आहे. येत्या विधानसभेत मला वाटतं मैत्रीपूर्ण लढत कुठे होणार नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे, आम्ही एकत्रपणे लढू असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री कोण होणार ?

आम्ही महायुतीकडून निवडणूक लढवत आहोत. सगळे आमदार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री कोणाला करायचं पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.आमचा मुख्यमंत्री होईल असं कोणी बोलू नये तो निर्णय महायुतीचा असेल. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु झाले आहे याबाबत विचारले असता ते म्हणाले की मला वाटतं जे नियमात आहे तेच सरकार करू शकतं. नियम बाह्य काही करू शकत नाही आणि कोर्ट ही त्याला मान्यता देणार नाही.आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि प्रामाणिक भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी ! मनोज जरांगे हेच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; कुणी केली ही घोषणा? मोठी बातमी ! मनोज जरांगे हेच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; कुणी केली ही घोषणा?
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट समाजातील विविध नेते घेत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू राजरत्न आंबेडकर...
सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आहे ही मराठमोळी अभिनेत्री, लग्न करण्यापूर्वी ठेवली होती ही अट
‘बिग बॉस मराठी सीजन 5’च्या निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप, थेट सूरज चव्हाणला..
Ind Vs Ban Test Series 2024- आमची 100 धावांवर बाद होण्याची तयारी होती…; रोहित शर्मा स्पष्टचं बोलला
फडणवीसांच्या पोस्टरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो ताटातील चटणीसारखा, अंबादास दानवे यांचा जबरदस्त टोला
सुंदर संतती प्राप्तीसाठी वहिनी दिरासोबत पळाली, पतीची पोलिसात धाव
दसर्‍याच धुणे धुण्यासाठी गेलेल्या पतीचा तलावात बुडून मृत्यू, पत्नीला वाचविण्यात नागरिकांना यश