मुंबईतील रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, मुख्यमंत्र्यांकडून डीनच्या बदलीचे आदेश, चौकशी समिती गठीत

मुंबईतील रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, मुख्यमंत्र्यांकडून डीनच्या बदलीचे आदेश, चौकशी समिती गठीत

कोलकोता येथील रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरावर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणावरुन देशभर वादळ उठले असताना मुंबईतील महानगरपालिकेच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी विद्यार्थींनीचा लैंगिक छळ झाल्याचा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने समोर आणला आहे. नायर हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थीनी एका प्रोफेसरकडून लैंगिक छळ झाल्याची तक्रार केली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर पावले उचलली आहे. रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले. तसेच रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यातचे सांगितले.

चौकशीत एक जण दोषी

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले की, सोमवारी नायर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना भेटलो. त्या ठिकाणी घडलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणानंतर सगळे जण प्रचंड दहशती खाली आहेत. नायरची वाटचाल कोलकात्ताच्या दिशेने होत आहे. महापालिका प्रशासनाने हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळले पाहिजे. विद्यार्थीनींनी आम्हाला सांगितले की, त्यांचा लैंगिक छळ महाविद्यालयात होत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करुनही कारवाई होत नाही. पॉश कमिटीने केलेल्या चौकशीत एक जण दोषी अढळला आहे. त्याला नायर परिसरातून बाहेर काढण्याऐवजी त्याच परिसरात क्वार्टर देण्यात आले आहे. मानवतावादी दृष्टिकोन ठेवून ही क्वार्टर देण्यात आल्याच पत्रक काढण्यात आले आहे. आमची तक्रार केल्यास एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

पोलीस ठाण्यात अशी वागणूक

संदीप देशपांडे यांनी सांगितले की, पोलीस स्टेशनला मुलगी तक्रार करायला गेल्यावरही एक महिला पोलिसाकडून स्टेटमेंट घेण्याऐवजी पुरुष पोलीस अधिकारी तिथे उभा करण्यात आला. आरोपीचा नंतर एन्काउंटर करण्याऐवजी घटना घडताना थांबवणे गरजेचे आहे. त्याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी करावी. मनसे या विद्यार्थ्यांच्या मागे आहे. त्या प्राध्यपकाविरोधात तक्रार देण्यास विद्यार्थ्यानी समोर यावे. ज्यावेळी आमच्याकडे अधिकृत तक्रार येईल, तेव्हा प्रशासन काय कारवाई करते त्याची वाट आम्ही पाहणार नाही. आम्ही आमच्या स्टाईलने कारवाई करु, असे त्यांनी म्हटले.

गुन्हा दाखल का केला नाही?

भाजप नेत्या चित्रा वाघ या प्रकरणावर म्हणाल्या, मुलींची परीक्षा असल्याने गुन्हा दाखल केला नाही. आज देखील मुलींनी जाऊन गुन्हा दखल करावा. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. शासन प्रशासन मुलींसोबत आहेत. संबंधित कोणीही आरोपी असतील त्यांना निश्चित शिक्षा होईल. या प्रकरणाचा संबंध दोन ते तीन प्राध्यापक अन् डीनशी आहे का? त्याची चौकशी होईल. कोणालाही पाठिशी घालण्यात येणार नाही, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कार्यकर्त्यांनी काय-काय करायचं? अमित शाह यांनी मुंबईतल्या मेळाव्यात आखला प्लॅन, भाजपने शड्डू ठोकला कार्यकर्त्यांनी काय-काय करायचं? अमित शाह यांनी मुंबईतल्या मेळाव्यात आखला प्लॅन, भाजपने शड्डू ठोकला
महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शड्डू ठोकला आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक ही...
‘त्यावेळी’ महाराष्ट्रात फक्त भाजपचंच सरकार येणार, अमित शाह यांचं मोठं विधान
बिग बॉस होस्ट करण्यासाठी या दिग्गज मराठी अभिनेत्याला होती ऑफर, का दिला नकार?
पंढरीनाथ कांबळे घरातून बाहेर येताच म्हणाला, निक्की-अरबाजची फालतुगिरी…
विदर्भाच्या विकासाची नितीन गडकरींनी केली पोलखोल, मोठे गुंतवणूकदार येत नसल्याची दिली कबूली
लेबनानमधील पेजर स्फोटानंतर आता इराणला iPhone स्फोटाचा धोका!
Bangkok मध्ये मोठी दुर्घटना; टायर फुटल्याने स्कूल बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती