अभिनेत्री रवीना टंडनच्या अडचणी वाढल्या, त्या व्हिडीओ संदर्भात चौकशीचे आदेश

अभिनेत्री रवीना टंडनच्या अडचणी वाढल्या, त्या व्हिडीओ संदर्भात चौकशीचे आदेश

अभिनेत्री रवीन टंडन हिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्ते मोहसीन शेख यांच्या तक्रारीवरून रवीना विरुद्ध तपास करण्याचे निर्देश बोरिवली मजिस्ट्रेट कोर्टाने सोमवारी मुंबई पोलिसांना दिले.
3 जानेवारी2025 पर्यंत याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 मार्च 2025 रोजी होणार आहे. अभिनेत्री रवीना टंडनच्या चालकाने बेदरकारपणे गाडी चालवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता. मात्र तो काढून टाकण्यासाठी संबंधित व्यक्तीवर दबाव टाकल्याचा आरोप रवीनावर लावण्यात आला आहे.

रवीना टंडनकडून अनेक बड्या व्यक्तींच्या माध्यमातून मोहसिन शेख या सामाजिक कार्यकर्त्यावर व्हिडिओ हटवण्यास दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोहसीन शेख यांनी आपल्या तक्रारीत अभिनेत्रीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (बदनामी) आणि कलम 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. रवीना टंडनच्या कथित रोड रेज घटनेचा व्हिडिओ मोहसीन शेखने त्याच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला होता. मात्र तो व्हिडिओ शेअर केल्यानंतर, रवीनाशी संबंधित अनेक प्रभावशाली व्यक्तींसह राजकारण्यांनी व्हिडिओ काढून टाकण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला, असा दावा शेखने केला आहे.

काय आहेत आरोप ?

आपल्यावर खंडणीचे खोटे आरोप लावण्यात आल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. समाजात त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या वर्षी जूनमध्ये रवीनाचा ड्रायव्हर वांद्रे येथील एका सोसायटीमध्ये कार रिव्हर्स घेत होता. तेव्हा रस्त्याने चालत असलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांनी त्याला रोखले. कार रिव्हर्स घेण्यापूर्वी मागे लोक आहेत का ते तपासावे, असे त्यांनी त्या ड्रायव्हरला सांगितले. त्यानंतर रीवानाचा कारचालक आणि ती माणसं यांच्यात बराच वाद झाला होता. रवीनाने मध्ये पडण्याचा प्रयत्न केला असता, तिच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.

काय आहे प्रकरण ?

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्या रवीना टंडनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात रवीना टंडन हिला काही लोकांनी घेरलं होतं. मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीने रवीनावर गंभीर आरोप केला. रवीना दारुच्या नशेत होती. आणि दारुच्या नशेतच तिने माझ्या आईला मारहाण केली, असा आरोप या व्यक्तीने केला आहे. तसेच रवीनाच्या ड्रायव्हरने त्याची गाडी माझ्या आईच्या अंगावर चढवली, असा गंभीर आरोपही त्याने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेची बरीच चर्चा सुरू होती. मात्र पोलिसांनी तपास केला असता अभिनेत्री रवीना टंडनच्या कारने कोणालाच टक्कर दिली नाही, हे त्यातून समोर आले.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो जादा फेऱ्या चालविणार, पाहा डीटेल्स नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो जादा फेऱ्या चालविणार, पाहा डीटेल्स
नवरात्र उत्सवाला होणारी गर्दी पाहून प्रवाशांच्या सोयीसाठी महामुंबई मेट्रोने पश्चिम उपनगरात जादा फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन...
सावरकर जर आता असते तर, यांच्या कानाखाली…; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा
धोनीसोबतच्या नात्याला अभिनेत्रीने म्हटलं होतं ‘डाग’; म्हणाली “हे फार काळपर्यंत..”
फोटोत ‘बॉयकट’मध्ये दिसणाऱ्या या मुलीला ओळखलंत का? आज आहे सर्वांत यशस्वी अभिनेत्री
Urmila Matondkar : घटस्फोटांच्या बातम्यांमुळे चर्चेत, उर्मिला मातोंडकर ‘बिग बॉस’मध्ये झळकणार ?
Video : शिव ठाकरे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात येणार; म्हणाला, इतिहासात पहिल्यांदाच…
सिडकोच्या कोंढाणे धरणात महायुतीचा 1400 कोटींचा महाघोटाळा; वडेट्टीवार यांनी केली सरकारच्या भ्रष्ट कारभाराची चिरफाड