फेसबुक पोस्ट, कमेंट अन् हाणामारी; जाणून घ्या वाराणसीतील हाय व्होल्टेज ड्रामा…

फेसबुक पोस्ट, कमेंट अन् हाणामारी; जाणून घ्या वाराणसीतील हाय व्होल्टेज ड्रामा…

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एका तरुणाला फेसबुकवर एका फोटोवर अश्लील कमेंण्ट करणं चांगलंच महागात पडले आहे. ज्या महिलेच्या फोटोवर त्याने कमेण्ट केली ती आपल्या पतीसोबत तरुणाच्या घरी पोहोचली. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. दरम्यान तरुणाच्या घरचे बाहेर आले आणि महिला यांच्यामध्ये जबरदस्त राडा झाला. महिलेने त्या तरुणाला बेदम मारायला सुरूवात केली आणि मग दोन्ही बाजूने एकमेकांना मारहाण करण्यात आली आणि आता हे प्रकरण पोलीस स्थानकात पोहोचले.

दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. ही घटना लालपूर पाड्येपुर येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरूणाने रोशनी कुशल जायसवाल या महिलेच्या फेसबुकवरील फोटोवर अश्लील कमेण्ट केली होती. ती पाहून महिला प्रचंड संतापली आणि ती त्या कमेण्ट करणाऱ्या तरुणाच्या थेट घरी पोहोचली. सोबत तिचा पतीही होता. दोघांनी त्या तरूणाच्या घरात जाऊन तमाशा केला. महिलेचा राग अनावर झाला आणि तिने त्या तरूणाला मारायला सुरूवात केली. ज्यावेळी तरूणाचे कुटुंब त्याला वाचवायला मध्ये पडले त्यावेळी महिलेने त्यांच्यासोबतही गैरवर्तन केले. एवढ्यात आजुबाजुच्या लोकांची गर्दी जमा झाली. लोकांनी त्यांची मध्यस्थी करण्याचा प्रय़त्न केला मात्र काहीच उपयोग झाला नाही. काही वेळाने महिला पोलीस स्थानकात गेली आणि त्या तरूणाविरोधात तक्रार दाखल केली.

आपल्या तक्रारीत महिलेने म्हंटले आहे की, राजेश सिंह नावाच्या तरूणाने तिच्या फोटोवर अश्लील कमेण्ट केली. तो अनेक दिवसांपासून असे करत होता. आधी ती त्याचे कमेण्ट डिलीट करायची. शिवाय तिने त्याला अशा कमेण्ट करू नको असे सांगितले देखिल. मात्र त्याच्या कमेण्ट्स, सुरूच राहिल्या. अखेर महिलेने तिच्या नवऱ्याला हा प्रकार सांगितला. त्याला धडा शिकविण्यासाठी दोघंही राजेशच्या घरी पोहोचले. त्यानंतर राजेश आणि त्याच्या कुटुंबियांनी त्यांना मारहाण केली. एवढेच नाही तर राजेशच्या कुटुंबियाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

तर राजेश सिंह यानेही पोलीस स्थानकात तक्रार दाखल करत महिलेवर गंभीर आरोप केले आहेत. त्याने त्याच्या कुटुंबियांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या तक्रारी लिहून घेतल्या आहेत. त्याचा तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भंडाऱ्यात सरकारी कार्यक्रमात लाडक्या बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज भंडाऱ्यात सरकारी कार्यक्रमात लाडक्या बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज
भंडाऱ्यात महिलांसाठी आयोजित पेटी वाटप कार्यक्रमात झुंबड उडाल्याने महिलांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना...
‘लाडकी बहिण’ ही संपूर्ण योजनाच भ्रष्टाचाराचं कुरण आहे, जितेंद्र आव्हाड यांची टीका
स्वरा भास्कर हिचा हैराण करणारा खुलासा, म्हणाली, फहादसोबतच्या लग्नाबद्दल आई वडिलांना सांगितल्यावर थेट…
अभिनेत्रीसोबत लिपलॉक केल्याने ट्रोल, आता दिसणार थेट ‘बिग बॉस 18’च्या घरात आणि…
यूपीत डॉक्टरचा प्रताप! जखमेला टाके घालताना डोक्यात सर्जिकल सुई ठेवली
चाकरमान्यांसाठी सूचना! 5 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेचे टाईम टेबल बदलणार, वाचा सविस्तर…
मिंधे सरकारचे मोठे अपयश… चाकण एमआयडीसीतून 50 कंपन्या गुजरात, आंध्र प्रदेशला स्थलांतरीत?