बाप्पाला निरोप देण्यासाठी पालिका सज्ज, विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलाव; भाविकांच्या सेवेसाठी 12 हजार अधिकारी, कर्मचारी तैनात

बाप्पाला निरोप देण्यासाठी पालिका सज्ज, विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलाव; भाविकांच्या सेवेसाठी 12 हजार अधिकारी, कर्मचारी तैनात

दहा दिवस भक्तांकडून पाहुणचार घेतल्यानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर बाप्पा आपल्या गावाला निघाले आहेत. बाप्पाचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. पालिकेचे सुमारे 12 हजार अधिकारी-कर्मचारी, 71 नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा गणेशमूर्ती विसर्जनासाठी 69 नैसर्गिक स्थळांसह एकूण  204 कृत्रिम विसर्जन स्थळांवर व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन स्थळी नागरिकांनी पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवा दरम्यान गर्दीच्या तसेच विसर्जन स्थळी जबाबदारीने आणि सतर्कतेने वागावे. पालिका आणि मुंबई पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

 मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून यंदाही अधिकाधिक सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.  मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू आहे. श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारी वाहने चौपाटीवरील वाळूमध्ये अडपू नयेत व श्री मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, याकरिता चौपाटीच्या किनाऱ्यांवर 478 स्टील प्लेट तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी 43 जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाटय़ांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 761 जीवरक्षकांसह 48 मोटरबोटी तैनात केल्या आहेत.

निर्माल्य कलशाची सोय

श्री गणेश मूर्ती विसर्जनापूर्वी भाविकांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी 163 निर्माल्य कलशांसह 274 निर्माल्य वाहनांचीही सोय करण्यात आली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने 66 निरीक्षण मनोरे

महानगरपालिकेच्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर 192 नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने 66 निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. विविध ठिकाणी 72 स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत.

75 प्रथमोपचार केंद्रांसह 67 रुग्णवाहिका

आरोग्य विभागाकडून 75 प्रथमोपचार केंद्रांसह 67 रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रभावी प्रकाश योजनेसाठी ‘बेस्ट’च्या सहकार्याने खांबांवर व उंच जागी सुमारे 1,097 फ्लडलाईट आणि 27 सर्चलाईट लावले आहेत. विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी 127 फिरती प्रसाधनगृहे सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहीत प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.

भरती, अहोटीच्या वेळी काळजी घ्या

अनंत चतुर्दशी दिवशी समुद्रात सकाळी 11.14 वाजता 4.54 मीटरची भरती, सायंकाळी 5.22 वाजता 0.86 मीटरची ओहोटी, रात्री 11.34 वाजता 4.39 मीटर उंचीची भरती असेल. 18 सप्टेंबर रोजी पहाटे 5.27 मिनिटांनी 0.48 मीटरची ओहोटी, सकाळी 11.37 वाजता 4.71 मीटरची भरती, सायंकाळी 5.49 वाजता  असेल. या भरती तसेच ओहोटी दरम्यान विसर्जनासाठी चौपाटय़ांवर येणाऱ्या नागरिकांनी सतर्प राहावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मत्स्यदंशापासून सावध राहा

ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर अधिक दिसून येतो. या पार्श्वभूमीवर विसर्जना दरम्यान मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मत्स्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच 108 रुग्णवाहिकादेखील तैनात केल्या आहेत.

‘क्यूआर कोड’वर मिळवा कृत्रिम तलावांची माहिती

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पालिकेने यंदा तब्बल 204 कृत्रिम तलाव तयार केले आहेत. ‘क्यूआर कोड’द्वारेदेखील भाविकांना, गणेश भक्तांना या कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा ‘क्यूआर कोड’ स्पॅन केल्यावर मुंबईतील कृत्रिम तलावांची माहिती आणि गुगल मॅप लिंक भाविकांना उपलब्ध होणार आहे. यामुळे मुंबईतील यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक होण्यासाठी मदत होणार आहे. तसेच https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlGanpatiDeQR या लिंकवरूनही कृत्रिम तलावांची माहिती मिळू शकते.

विसर्जनादरम्यान अशी घ्या खबरदारी

  खोल समुद्रात जाऊ नका.

  विसर्जनाकरिता पालिकेमार्फत नेमलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्या.

  अंधार असणाऱ्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरिता जाणे टाळावे.

  अफवांवर विश्वास ठेवू नका.

  पालिकेने पोहण्याकरिता मनाई केलेल्या क्षेत्रात जाऊ नका.

  पुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित अग्निशमन जवान, पोलीस किंवा जीवरक्षकांना कळवा.

  लहान मुलांची विशेष काळजी घ्या.

‘लालबागचा राजा’ची दर्शनाची रांग आजपासून बंद

नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असलेल्या ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी देश-विदेशातून गणेशभक्त येतात. लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वतयारीसाठी उद्या, सोमवारपासून दर्शनाची रांग बंद करण्यात येणार आहे. उद्या पहाटे
6 वाजता चरणस्पर्शची रांगही बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर मुखदर्शनाची रांग उद्या रात्री 12 वाजता बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती लालबागचा राजा मंडळातर्फे देण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गोविंदाने थेट केले पत्नीसमोरच ‘या’ अभिनेत्रीचे तोंडभरून कौतुक, पुढे जे घडले ते अत्यंत.. गोविंदाने थेट केले पत्नीसमोरच ‘या’ अभिनेत्रीचे तोंडभरून कौतुक, पुढे जे घडले ते अत्यंत..
बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवलाय. गोविंदाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. गोविंदा याने त्याच्या आतापर्यंतच्या...
जन्मावेळी बाळाचं वजन किती हवं ? वजन कमी असल्याचे काय तोटे ?
घाटकोपर येथे बेस्टच्या बसला आग, वाहक जखमी
अटल सेतूवर कार उभी केली, मग तरुणाने समुद्रात उडी घेतली
कोकण कृषी विद्यापीठात कार्यरत असलेल्या लेट लतिफांना समज देणार
लडाखजवळ चिनी सैन्याकडून क्षेपणास्त्र चाचणी, हिंदुस्थानची चिंता वाढली!
Ind Vs Ban 2nd Test Match – पावसाने विश्रांती घेताच विराट बरसला! सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडीत