फेक न्यूज पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा!

फेक न्यूज पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा!

कर्नाटकातील गणपती विसर्जनाबाबत फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. यासंदर्भात कुलाबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कर्नाटकातील घटनेची सत्य माहिती 13 सप्टेंबर रोजी बेंगलूरूच्या टाऊन हॉल परिसरात कोणतीही परवानगी न घेता विश्व हिंदू परिषदेने आंदोलन आयोजित केले होते. यावेळी आंदोलक गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलन करत होते. आंदोलकांना ताब्यात घेताना मूर्तीला इजा होऊ नये म्हणून पोलिसांनी मूर्ती सुरक्षित ठेवली व आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी विधिवत पूजा अर्चना करून गणपतीबप्पाचे विसर्जन केले. ही माहिती अनेक फॅक्ट चेक करणा-या वेबसाईट्स व राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी फॅक्ट चेकच्या माध्यमातून सार्वजनिक केली आहे.

पण राजकीय फायद्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया देताना कर्नाटक सरकारने व पोलिसांनी गणपती उत्सव थांबवून गणपतीची मूर्ती जप्त केली असे धडधडीत असत्य विधान करून सणासुदीच्या काळात राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या एक्स (ट्वीटर) हँडलवरून या संदर्भात चुकीची माहिती प्रसारित करून कर्नाटकच्या काँग्रेसला जबाबदार धरले.

तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात खोटी माहिती प्रसारित करून समाजात तेढ आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा व सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई अशी मागणी करणारी लेखी तक्रार प्रदेश काँग्रेसच्या विधि विभागाचे अध्यक्ष अॅड. रविप्रकाश जाधव यांनी कुलाबा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकाकडे केली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षाचे नेत्यांकडून सातत्याने फेक न्यूज आणि अफवा पसरवून राज्यात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांचे हे कृत्य सामाजिक शांतता भंग करणारे आहे. पोलिसांनी यांची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भंडाऱ्यात सरकारी कार्यक्रमात लाडक्या बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज भंडाऱ्यात सरकारी कार्यक्रमात लाडक्या बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज
भंडाऱ्यात महिलांसाठी आयोजित पेटी वाटप कार्यक्रमात झुंबड उडाल्याने महिलांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना...
‘लाडकी बहिण’ ही संपूर्ण योजनाच भ्रष्टाचाराचं कुरण आहे, जितेंद्र आव्हाड यांची टीका
स्वरा भास्कर हिचा हैराण करणारा खुलासा, म्हणाली, फहादसोबतच्या लग्नाबद्दल आई वडिलांना सांगितल्यावर थेट…
अभिनेत्रीसोबत लिपलॉक केल्याने ट्रोल, आता दिसणार थेट ‘बिग बॉस 18’च्या घरात आणि…
यूपीत डॉक्टरचा प्रताप! जखमेला टाके घालताना डोक्यात सर्जिकल सुई ठेवली
चाकरमान्यांसाठी सूचना! 5 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेचे टाईम टेबल बदलणार, वाचा सविस्तर…
मिंधे सरकारचे मोठे अपयश… चाकण एमआयडीसीतून 50 कंपन्या गुजरात, आंध्र प्रदेशला स्थलांतरीत?