धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर मुंबईचं पाणी बंद करू, कुणी दिला इशारा ?

धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर मुंबईचं पाणी बंद करू, कुणी दिला इशारा ?

धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर आम्ही मुंबईचं पाणी बंद करू असा थेट इशारा अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांनी दिला आहे. लहामटे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत असून मुंबईला जाणारे रस्ते थांबवणार, रेल्वेचे रूळ उखडून काढू असा इशारादेखील लहामटे यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह असून राज्यात काय पडसाद उमटतात याकडे लक्ष लागलं आहे.

काय म्हणाले किरण लहामटे ?

जर धनगरांसाठीचा जीआर काढला, जर शासनाने धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या संदर्भात पाऊल उचललं तर आम्ही सर्व आदिवासी समाजातील अमदार आणि खासदार आक्रमक पवित्रा घेऊ ,अशी भूमिका त्यांनी मांडली. आत्तापर्यंत आदिवासांनी एवढा त्याग केला आहे, जर तुम्ही आमच्या बोकांडी बसाल तर आम्ही मुंबईचं पाणी बंद करू, तिथे जोडणारे जे रस्ते आहेत ते थांबवू, रेल्वेचे रूळ उखडून टाकू असा थेट इशारा लहामटे यांनी दिला.

मुळात धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या संदर्भातील निर्णय हा केंद्राचा आहे. धनगर समाजातील नेत्यांनी सुद्धा आम्हाला वेगळं आरक्षण द्या अशी मागणी केली आहे त्यामुळे सरकारने असं करू नये, ते पाऊल उचललं तर आम्ही दाखवून देऊ असंही लहामटे यांनी ठणकावलं.

अजित पवार यांना महायुतीमधून कोणीच काढू शकत नाही 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचा दावा महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्याने केला आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापूर्वी अजित पवार महायुतीतून बाहेर पडावेत यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून चक्रव्यूह रचण्यात येत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यावरही लहामटे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘अजित पवार यांना महायुती मधून कोणीच बाहेर काढू शकत नाही’असा दावा त्यांनी केला. ‘महायुती कडून विकासकामांचा पाढा लावण्यात आला आहे.आणि अमचा पक्ष हा शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांचा आहे’ असे त्यांनी नमूद केलं.

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठीच्या समितीची आज बैठक

दरम्यान धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची तिसरी बैठक आज होणार आहे. ओबीसी मंत्रालयाचे प्रधान सचिव सौ विनिता सिंगल यांच्या दालनामध्ये
आज (23 सप्टेंबर) दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीस मा. आ प्रकाश आण्णा शेंडगे,आमदार गोपीचंद पडळकर, पांडूरंग मेरगळ व इतर सदस्य,संबंधित विभागाचे सचिव उपस्थित राहणार आहेत. पहिल्या बैठकीत सादर केलेले कायदेशीर व घटनात्मक पुरावे यांचा आधार घेऊन S.T आरक्षण अमलबजावणी साठी कसा उपयोग होईल याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होईल.

एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजातर्फे आज राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापुरात पुणे बेंगलोर महामार्ग जवळील तावडे हॉटेल चौकात धनगर समाज करणार आंदोलन. कोल्हापूर मधील आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर सहभागी होणार असून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तावडे हॉटेल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

साहेब आमचे दैवत… अजित पवार गटाच्या नेत्याकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; मनात नेमकं काय? साहेब आमचे दैवत… अजित पवार गटाच्या नेत्याकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; मनात नेमकं काय?
राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे शरद...
धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर मुंबईचं पाणी बंद करू, कुणी दिला इशारा ?
Aishwarya Rai: 80 वर्षांची झाल्यावर कशी दिसेल ऐश्वर्या राय? सुरकुत्या पडूनही सौंदर्य असेल कायम
Aishwarya Rai : नणंद-भावजयीत विस्तव जात नाही.. श्वेता-ऐश्वर्यामध्ये काय बिनसलं ? बच्चन कुटुंबात काय घडतंय ?
‘नवरा माझा नवसाचा 2’ची ट्रेन सुसाट; तीन दिवसांत कमावले इतके कोटी रुपये
प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, मंदिर महासंघाची मागणी
खंबाटकी घाटात थरार, भरधाव कंटेनरने दहा गाडय़ांना उडविले