हायकोर्टाचा मुंबई विद्यापीठाला झटका, सिनेटच्या निवडणुका उद्याच घेण्याचे आदेश

हायकोर्टाचा मुंबई विद्यापीठाला झटका, सिनेटच्या निवडणुका उद्याच घेण्याचे आदेश

मुंबई सिनेटच्या निवडणुका उद्याच होणार असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मुंबई विद्यापीठाने सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाने मुंबई विद्यापीठाला फटकारले आहे. त्यामुळे सिनेटच्या निवडणुका उद्याच घ्यावा लागणार आहे. ठाकरे गटाच्या बाजुने कोर्टाने निकाल दिला आहे. ठाकरे गटाच्या वतीने सिद्धार्थ मेहता यांनी बाजु मांडली होती. त्यानंतर आता उद्याच निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

सिनेट निवडणूक मंगळवारी घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. उद्याच निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर एवढ्या अपुऱ्या वेळेत निवडणूक घेणे शक्य नसल्याचं विद्यापीठनं मत मांडले आहे. न्यायमूर्ती आशिष चांदोरकर यांच्या चेंबरमध्ये विद्यापीठाच्या वतीने हे मत मांडण्यात आलं आहे.

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित केल्यानंतर ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे आता रविवारी 22 सप्टेंबरलाच मुंबई विद्यापीठाची निवडणूक होणार आहे. मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढत निवडणुका पुढे ढकल्याचा निर्णय़ घेतला होता. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. महाराष्ट्राने एवढे घाबरट, गद्दार मुख्यमंत्री याआधी कधीही पाहिलेले नाहीत, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला.

आदित्य ठाकरे यांनी सिनेट निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांचे कौतुक केले. ते म्हणाले की, आज तुमचा विजय झाला आहे, सिनेटच्या सर्व उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद आहे.  आज आमचा विजय निश्चित झालेला आहे. डरपोक CM म्हणजे नावापुढे DCM लावायला हवं, हे आता स्पष्ट झालेलं आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
‘मुंबई विद्यापीठाचे सिनेट निवडणूक काल स्थगित करण्यात आली होती त्या संदर्भात युवासेनेकडून याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानू इच्छितो. कारण वेळीच त्यांनी सुनावणी घेऊन उद्याच्या उद्या निवडणूक घेण्याविषयी निर्देश दिले. हा विजय केवळ युवा सेनेचा नसून 13 हजार 500 पदवीधरांचा विजय आहे. या सरकारने जे पदवीधरांच्या बाबतीत षडयंत्र रचल होतं ते न्यायालयाने हाणून पाडला आहे. उच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो. त्यासोबतच युवासेना निवडणुकीसाठी सज्ज आहे. दहापैकी दहा जागा जिंकू’ असा विश्वास वरून सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.

सरकारच्या मनात भीती असल्याने त्यांना विधानसभेच्या आधी कोणतीही निवडणूक घ्यायची नाही. ते डरपोक आहेत. त्यांना निवडणुकीला सामोरे जायचे नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अजूनही झालेल्या नाहीत. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतही ते हरतील, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळेच ते निवडणुका घेत नाहीत”, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाहेरच्या लोकांना आम्ही का कड्यावर घ्यायचं, राज ठाकरे कडाडले बाहेरच्या लोकांना आम्ही का कड्यावर घ्यायचं, राज ठाकरे कडाडले
वरळी व्हिजन या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी सरकार आणि विरोधक दोघांवर टीका केली आहे. मराठी माणसांच्या हातातून मुंबई जातेय...
स्वाभिमानाने जगायचं असेल तर स्वाभिमानी मणका दुरुस्त करून घ्या- राज ठाकरे कडाडले
रजनीकांत यांनी केला थेट अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाले, त्यावेळी…
सामाजिक कार्यकर्त्या ते दिल्लीच्या मुख्यमंत्री, असा आहे आतिशी यांचा राजकीय प्रवास
Nagar News – नगर जिल्हा सहकारी बँक कोणत्याही क्षणी संपुष्टात येवू शकते, ॲड. प्रतापराव ढाकणे यांचा आरोप
भाजप जिंकले तर ईद आणि मोहरमला दोन सिलेंडर फ्री, अमित शहा यांची घोषणा
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखान्यांना 10 हजार कोटीचा फटका, शंकरराव गडाख यांचा आरोप