किनाऱ्यावर होणारे भराव, समुद्रात सोडले जाणारे केमिकलमिश्रित सांडपाणी; रायगडच्या समुद्रातून जिताडा, रावस, शेवंड पळाले

किनाऱ्यावर होणारे भराव, समुद्रात सोडले जाणारे केमिकलमिश्रित सांडपाणी; रायगडच्या समुद्रातून जिताडा, रावस, शेवंड पळाले

समुद्रकिनारी करण्यात येणारा भराव, समुद्रात सोडण्यात येणारे केमिकल कंपन्यांचे सांडपाणी यामुळे जिल्ह्यात मत्स्य उत्पादन सुमारे तीन हजार मेट्रिक टनांनी घटले आहे. मत्स्य उत्पादन घटल्याने मच्छीमारांच्या आर्थिक अडचणींमध्ये वाढ झाली आहे. जिताडा, रावस आणि शेवंड हे सर्वाधिक मागणी असणारे मासे समुद्रातून गायब झाल्यामुळे मच्छीमार हवालदिल झाले आहेत.

राज्याला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यावर दर्जेदार मासळी मिळते. त्यासाठीच कोकणची किनारपट्टी ओळखली जाते. रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील 112 गावांमध्ये मासेमारीचा व्यवसाय चालतो. 4 हजार 943  नौकांच्या माध्यमातून 30 हजार कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. रायगड जिल्ह्यात पूर्वी वर्षाला सरासरी 42 हजार मेट्रिक टन मासेमारी करण्यात येत होती. मात्र मागील काही वर्षांत जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन घटत चालले आहे. सध्या 39 हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन वर्षभरात घेतले जात आहे. त्यातच प्रमुख माशांच्या प्रजातींचेही उत्पादन घटल्याने मासेमारीच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. सरकारी उदासीनतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे.

प्रमुख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात घट झाली असतानाच बाजारात जास्त दर असलेल्या जिताडा, पाला, रावस, दाडा, ताम, वाम आणि शेवंड या जातीच्या मासळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे मासेमारांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात सध्या पापलेट, सुरमई, रावस, भाकस, कोलंबी, माकुल, मांदेली, बांगडा, बोंबिल या जातींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने मासेमारांना थोडा दिलासा मिळाला आहे.

दुष्काळ जाहीर होणार नाही

प्राक्कलन समितीच्या निकषानुसार मत्स्य विभागामार्फत मासळींची मोजणी केली जाते. सलग तीन वर्षे उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाल्यास मत्स्य दुष्काळ जाहीर करता येतो. मात्र रायगड जिल्ह्यात अशी परिस्थिती नसल्याने जिल्ह्यात मत्स्य दुष्काळ नसल्याचे रायगडचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

सरकारची उदासीनता

मत्स्य उत्पादनवाढीसाठी कोकणात दर्जेदार बंदरांचा विकास होणे गरजेचे आहे. मत्स्य निर्यातीला प्रोत्साहन देणारा एकही प्रकल्प जिल्ह्यात नाही. शीतगृह, मत्स्य प्रक्रिया केंद्र सुरू होऊ शकलेले नाही. कोकणातल्या इतर दोन जिल्ह्यांतही परिस्थिती फारशी वेगळी नाही. मत्स्य व्यवसायात सुधारणा झाल्यास मासेमारांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे मत अनेक मच्छीमारांनी व्यक्त केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Navratri Utsav 2024 – श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपरिक लमाणी पोषाखासह अलंकार परिधान Navratri Utsav 2024 – श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपरिक लमाणी पोषाखासह अलंकार परिधान
घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरवात झाली आहे. या निमित्त दुपारी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे दुसऱ्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक...
तरुणीला गुंगीचे औषध पाजून ब्लॅकमेल करणार्‍या बिल्डर पुत्राची निर्घृण हत्या, मुलीच्या मित्राने काढला काटा
Salil Ankola – माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा घरात मृतदेह आढळला
Photo – लाल परी! ऑफ शोल्डर गाऊनमध्ये शहनाज गिलचा ग्लॅमरस अंदाज
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जाणार पाकिस्तानात, SCO बैठकीला लावणार हजेरी
खवय्यांनो सावध व्हा! FSSAI ने सांगितलं केक ठरू शकतो कर्करोगाचं कारण? वाचा सविस्तर…
महिलांचे हक्क आणि अंमलबजावणी करण्यासाठीचे कायदे’ विषयावर शिबीर