भिवंडीचे डीसीपी श्रीकांत परोपकारी यांची उचलबांगडी

भिवंडीचे डीसीपी श्रीकांत परोपकारी यांची उचलबांगडी

भिवंडीत सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीवर मंगळवारी मध्यरात्री दगडफेकीची घटना घडली. यानंतर पोलिसांनी मोठ्या कौशल्याने परिस्थिती हाताळत विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडली. डीसीपी श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आपला जीव धोक्यात घालून धार्मिक दंगल घडवण्याचा समाजकंटकांचा डाव हाणून पाडला. मात्र राज्य सरकारने पोलिसांचे कौतुक करण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम केले आहे. सरकारने डीसीपी श्रीकांत परोपकारी यांची तडकाफडकी बदली करून दंगल रोखल्याचे ‘बक्षीस’ दिले आहे. याबाबद्दल पोलीस दलात नाराजीचा सूर आहे.

मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता वंजारपट्टी नाका या ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणूक आली असता अचानक अज्ञातांनी दगडफेक केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी गणेशभक्त, हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले. दोन्ही समाज समोरासमोर आला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी किरकोळ लाठीमार केला. दोन्ही गटाच्या जमावाला पांगवले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम पोलिसांनी केले. दंगलसदृश परिस्थिती आटोक्यात आणण्यात पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण होती.

एका बड्या नेत्याला दंगल पेटवायची होती

दंगल थांबविण्याचे काम भिवंडीचे पोलीस उपायुक्त श्रीकांत
परोपकारी यांनी केले म्हणून त्यांची बदली करण्यात आली. भिवंडीतील भाजपच्या एका बड्या नेत्याला दंगल पेटवायची होती, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती टळली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला. सत्ताधारी पोलिसांचा वापर राजकीय हत्यार म्हणून करीत असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.

पोलीस आयुक्तांनी घेतला आढावा

शहरातील तंग वातावरण पाहता बुधवारी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे हे संपूर्ण दिवस भिवंडीत ठाण मांडून होते. त्यांनी या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांकडून तसेच इतर घटकांकडून संपूर्ण घटनाक्रमांची माहिती घेत शासनाला अहवाल पाठविला होता. मात्र समाजकंटकावर कारवाई करण्याऐवजी शासनाने डीसीपी श्रीकांत परोपकारी यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी मुंबईतील पोलीस उपायुक्त मोहन दहीकर यांची नियुक्ती केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दयाबेनला बिग बॉसकडून मिळत होते तब्बल 65 कोटी, दिशा वकानी हिने तरीही… दयाबेनला बिग बॉसकडून मिळत होते तब्बल 65 कोटी, दिशा वकानी हिने तरीही…
दयाबेन अर्थात दिशा वकानी हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. तारक मेहता मालिकेत दिशा वकानी ही...
पत्नीची ‘ही’ अवस्था पाहून अभिनेत्याने थेट घेतला हा अत्यंत मोठा निर्णय, कधीच आयुष्यात…
ठरलं! या तारखेला हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश
Mega Block News – मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर दहा तासांचा मेगाब्लॉक, अनेक गाड्या रद्द
Navratri Utsav 2024 – श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपरिक लमाणी पोषाखासह अलंकार परिधान
तरुणीला गुंगीचे औषध पाजून ब्लॅकमेल करणार्‍या बिल्डर पुत्राची निर्घृण हत्या, मुलीच्या मित्राने काढला काटा