मिंधेंचा करंटेपणा, महाराष्ट्राचा आणखी एक प्रकल्प गुजरातला, 18 हजार कोटींचा सोलार पॅनल प्रकल्प घालवला

मिंधेंचा करंटेपणा, महाराष्ट्राचा आणखी एक प्रकल्प गुजरातला, 18 हजार कोटींचा सोलार पॅनल प्रकल्प घालवला

मिंधे सरकारच्या करंटेपणामुळे महाराष्ट्रात येणारे अनेक मोठे उद्योग इतर राज्यांमध्ये गेले. लाखो रोजगारांची निर्मिती करणारे बहुतांश उद्योग मिंध्यांनी गुजरातच्या घशात घातले. ते चक्र अजूनही सुरूच असून महाराष्ट्राच्या हक्काचा आणखी एक प्रकल्प आज गुजरातला गेला. नागपूरमध्ये उभारला जाणारा 18 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा आणि रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध करून देणारा सोलार पॅनल प्रकल्प सरकारने घालवला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मिंधे सरकारच्या या नाकर्तेपणाची पोलखोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 1 लाख 54 हजार कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प तसेच टाटा एअरबस विमान प्रकल्प, मेडिकल डिव्हाईस पार्क, बल्क ड्रग पार्क हे लाखो कोटींचे प्रकल्प लाखो रोजगार देणारे होते, परंतु ते एकापाठोपाठ एक महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले. आता नागपूरमध्ये येऊ घातलेला सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये गेला, असे वडेट्टीवार म्हणाले.

हिंदू-मुस्लिम, जीभ कापा-जिभेला चटके द्या, पक्ष फोडा- आमदार पळवा, असे सतत निरर्थक उद्योग करणाऱया महायुती सरकारमुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे. अधिकारी मंत्र्यांना खूश करण्यात सरकार व्यस्त आहे. मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे आणि राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

मंत्र्यांची मस्ती आणि आमदारांचे नको ते लाड

राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे आणि राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.

फडणवीस नाकाम

रिन्यू कंपनीचा सोलार पॅनल प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात उभारला जाणार होता; परंतु तो गुजरातला जाण्यापासून रोखण्यात फडणवीस नाकाम ठरले असल्याची टीका होत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तर वडेट्टीवार यांना प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची माहिती कुणी दिली, असा उलट सवाल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Bigg Boss Marathi 5:  सूरज चव्हाणचं मोठं सिक्रेट लीक, होणार ‘बिग बॉस’च्या घराचा मालक? Bigg Boss Marathi 5: सूरज चव्हाणचं मोठं सिक्रेट लीक, होणार ‘बिग बॉस’च्या घराचा मालक?
Suraj Chavan Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी 5′ च्या घरातील अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा प्रवास तब्बल 67 दिवसांनी संपल्यानंतर...
Bigg Boss Marathi 5: ‘प्रवासात मी अनेक आव्हानांचा…’, शोमधून निरोप, वर्षा उसगांवकर झाल्या व्यक्त
मोदी-शहांचे वाढते महाराष्ट्र दौरे आणि सभांवरून शरद पवार यांचा चिमटा; म्हणाले ‘आणखी या’
50 % पर्यंतचे आरक्षण 75% पर्यंत जाऊ द्या! शरद पवार यांचं मोठं विधान
त्यांनी ‘दम मारो दम’ सिनेमा काढावा! स्वबळावर सत्ता स्थापण्याचे स्वप्न बघणाऱ्या भाजपला संजय राऊतांचा सणसणीत टोला
पुणे हादरले… बोपदेव घाट परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्कार
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा मोठा सन्मान; संजय राऊत यांची प्रतिक्रिया