कोपरगावातील नवश्या मारुती परिसरात दुपारी गोळीबार, एक जखमी

कोपरगावातील नवश्या मारुती परिसरात दुपारी गोळीबार, एक जखमी

कोपरगाव शहरातील गजबजलेल्या भागांपैकी एक असणाऱ्या स्वामी समर्थ केंद्र कमानी समोर नवश्या मारुती परिसरात गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवश्या मारुती परिसरात दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. गोळीबारात तनवीर हमीफ रंगरेज (वय 36) हा तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणाला उपचारांसाठी तात्काळ नाशिक येथे हलवण्यात आले आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहे.

स्वामी समर्थ मंदिर नवशा गणपती परिसर या मध्यवर्ती भागामधील गजबजलेल्या भागांपैकी एक आहे. याच रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या रस्त्यावर सोमय्या कॉलेज असून ही वेळ कॉलेज सुटण्याची असते. काही अंतरावरच कोपरगाव शहर पोलीस स्थानक आहे. त्यामुळे अशा ठिकाणी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष
तुमची  सकाळची एक चुक डोकं आणि मानेचा कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते. नवीन अभ्यासात असे आढळले आहे की दररोज ब्रश करणारे...
कोणी पैसे देत का पैसे! पाकिस्तानी खेळाडूंचे बेकार हाल, चार महिन्यांपासून पगारच मिळाला नाही
निवडणुकांच्या तोंडावर का होईना अखेर केंद्र सरकार झुकलं… मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
महामारीसाठी तयार रहा, काळजी वाढवणारा निती आयोगाचा अहवाल
अखेर आज तो सुदिन अवतरला; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; राज्यातील नेते काय म्हणाले?
महाभारतात द्रौपदीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री रुपा गांगुली यांना अटक, कारण काय?
शिवतीर्थावर आवाज शिवसेनेचाच! पालिकेकडून मेळाव्यासाठी रीतसर परवानगी, उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार