एकीकडे हिंदूंवर अत्याचार, दुसरीकडे बांगलादेशी क्रिकेटपटूंसाठी पायघड्या; आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारला फटकारलं

एकीकडे हिंदूंवर अत्याचार, दुसरीकडे बांगलादेशी क्रिकेटपटूंसाठी पायघड्या; आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारला फटकारलं

बांगलादेशमध्ये जुलै महिन्यात आरक्षणविरोधात जनता रस्त्यावर उतरली आणि उग्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान हिंदू समाजाला विशेषकरून टार्गेट करण्यात आले. आजही तिथला हिंदू समाज भीतीच्या छायेखाली जगत आहे. एकीकडे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असताना दुसरीकडे बांगलादेशी क्रिकेटपटूंसाठी हिंदुस्थानमध्ये पायघड्या टाकल्या जात आहेत. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला फटकारले आहे.

हिंदुस्थान आणि बांगलादेश संघात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही सामने चेन्नईत खेळले जाणार असून पहिला सामना 19 सप्टेंबरपासून सुरू होईल. या सामन्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी रात्री एक ट्विट केले. यात त्यांनी बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराचा दाखला देत परराष्ट्र मंत्रालयाला काही बोचरे सवाल विचारले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, बांगलादेशचा क्रिकेट संघ हिंदुस्थान दौऱ्यावर आहे. काही माध्यमे आणि सोशल मीडियावर आलेल्या वृत्तानुसार गेल्या 2 महिन्यात बांगलादेशमधील हिंदूंना हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे का? परराष्ट्र मंत्रालयाकडून हे जाणून घेण्यास उत्सूक आहे.

याचे उत्तर होय असे असेल आणि हिंदूंसह इतर अल्पसंख्यांना बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा सामना करावा लागला असेल तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार बीसीसीवर एवढे मेहरबान का आहे आणि दौऱ्याला परवानगी का देत आहे? आणि उत्तर नाही असे असेल तर बांगलादेशमधील हिंसाचाराबाबत सोशल मीडिया व माध्यमांतील वृत्तांशी परराष्ट्र मंत्रालय सहमत आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

बांगलादेशातील हिंसाचाराच्या निमित्ताने इथे ट्रोल्स देशवासियांमध्ये द्वेष पसरवत आहेत आणि त्याच बांगलादेशी संघासाठी बीसीसीआय पायघड्या अंथरत आहे. या हिंसाचाराविरोधात सक्रियप्रणे प्रचार करणारे बीसीसीआयला एकही प्रश्न विचारत नाहीत याचे मला आश्चर्य वाटत आहे. हा फक्त हिंदुस्थानात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की केवळ निवडणुकीचा प्रचार आहे? असा बोचरा सवालही आदित्य ठाकरे यांनी सरकारला केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अमित शहांना स्वप्नदोष झाला आहे – संजय राऊतांचा टोला अमित शहांना स्वप्नदोष झाला आहे – संजय राऊतांचा टोला
अमित शहांना स्वप्नदोष झालाय, याला स्वप्न दोष म्हणतात. संपूर्ण भारतीय जनता पक्षालाचा स्वप्नदोषाचा विकार जडला आहे. अमित शाह हे देशाचे...
चलो मुंबई… हेच का अच्छे दिन?; शिंदे सरकारच्या विरोधात संभाजीराजे मोर्चा काढणार
Govinda Health Update: स्वतःच्या पायावर कधी उभा राहणार गोविंदा? कशी आहे अभिनेत्याची प्रकृती?
हृतिक रोशनचं झालंय दुसरं लग्न? पोस्ट पाहून चाहते चकीत, पहिली पत्नी म्हणाली…
गोविंदाला गोळी लागण्यामागे कट-कारस्थान? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले..
थिएटरमध्ये अरबाज खानला पत्नीने सर्वांसमोर केलं किस; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव
जेव्हा आरशात मी चेहरा पाहिला…; महिमा चौधरीने सांगितली त्या भीषण अपघाताची आठवण