Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : जीभ छाटण्यापासून ते विष्ठेपर्यंत बेताल वक्तव्य, पाहा Video

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : जीभ छाटण्यापासून ते विष्ठेपर्यंत बेताल वक्तव्य, पाहा Video

शिंदेंचे आमदार संजय गायकवाड, राहुल गांधींची जीभ छाटण्याच्या मागे लागलेत. तर, भाजप समर्थित आमदार सदाभाऊ खोत, महाविकास आघाडीला रेडा समजून चाबकानं फोडण्याची भाषा करतायत. सुरुवातीला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांबद्दल पाहा. पक्षपातीपणा थांबेल तेव्हा काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल, असं राहुल गांधी म्हणाले होते. अमेरिकेतल्या राहुल गांधींच्या या वक्तव्याला एक आठवडा होतोय. त्यावरुन महाराष्ट्रात भाजपची आंदोलनंही झाली. पण, आता राहुल गांधींची, जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं इनाम देण्याची घोषणाचा संजय गायकवाडांनी केली.

संजय गाकवाडांआधी, दिल्ली भाजपचे नेते तरविंदर सिंह मारवा यांनी तर दादी जैसा हाल करेंगे म्हणत जीवे मारण्याचीच धमकी दिली. काँग्रेसचे हायकमांड आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींची जीभ उडवण्याची भाषा केल्यानं, काँग्रेसचे नेते गायकवाडांवर तुटून पडले. तर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी, गायकवाडांचं वक्तव्य चूक असल्याचं म्हटलंय. संजय गायकवाडां पाठोपाठ आपल्या वक्तव्यानं चर्चेत राहणाऱ्या सदाभाऊ खोतांनीही, महाविकास आघाडीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या रेड्यांना चाबकानं फोडून काढणार, असं सदाभाऊ म्हणालेत.

पाहा व्हिडीओ:-

इकडे गोपीचंद पडळकरांनी पुन्हा शरद पवारांना टार्गेट करत, जातीवादाचा कॅन्सर अशी टीका केलीय. शरद पवार म्हणतात, सत्ता हातात आल्यावर महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल. पण पवार साहेब, तुमच्यामुळेच महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला. 50-60 वर्ष महाराष्ट्र लुटणं, शिवरायांच्या तेजाची झळाळी हरवणं, हेच तुमचं वारसाहक्क आहे. महाराष्ट्राचा सर्वसमावेशक विकास थांबवून पुन्हा सरंजामी राजवट आणायची आहे का? दलित-ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का? संजय गायकवाड, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे तिघेही नेते आपल्या वक्तव्यानं वादाला फोडणी देतात. आता निवडणुकांमुळं पुन्हा प्रक्षोभक आणि बोचरी वक्तव्य सुरु झालीत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कार्यकर्त्यांनी काय-काय करायचं? अमित शाह यांनी मुंबईतल्या मेळाव्यात आखला प्लॅन, भाजपने शड्डू ठोकला कार्यकर्त्यांनी काय-काय करायचं? अमित शाह यांनी मुंबईतल्या मेळाव्यात आखला प्लॅन, भाजपने शड्डू ठोकला
महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शड्डू ठोकला आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक ही...
‘त्यावेळी’ महाराष्ट्रात फक्त भाजपचंच सरकार येणार, अमित शाह यांचं मोठं विधान
बिग बॉस होस्ट करण्यासाठी या दिग्गज मराठी अभिनेत्याला होती ऑफर, का दिला नकार?
पंढरीनाथ कांबळे घरातून बाहेर येताच म्हणाला, निक्की-अरबाजची फालतुगिरी…
विदर्भाच्या विकासाची नितीन गडकरींनी केली पोलखोल, मोठे गुंतवणूकदार येत नसल्याची दिली कबूली
लेबनानमधील पेजर स्फोटानंतर आता इराणला iPhone स्फोटाचा धोका!
Bangkok मध्ये मोठी दुर्घटना; टायर फुटल्याने स्कूल बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती