इडली खायची स्पर्धा जिवावर बेतली, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

इडली खायची स्पर्धा जिवावर बेतली, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

केरळमध्ये इडली खाण्याची स्पर्धा एका व्यक्तीच्या जिवावर बेतली आहे. इडली घशात अडकून श्वास गुदमरल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ओणम सणानिमीत्त आयोजित एका स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता.

केरळ राज्यातील ओणम हा प्रमुख सण असल्यामुळे धुमधडाक्यात साजरा केला जातो. त्यानिमीत्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशाच एका कार्यक्रमात इडली खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 49 वर्षीय सुरेश यांनी सुद्धा भाग घेतला होता. स्पर्धेदरम्यान इडली खाताना सुरेश यांच्या घशात इडली अडकल्याने त्यांचा श्वास गुदमरला. उपस्थित नागरिकांनी त्यांच्या घशातून इडली काढली व त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा झाली नाही आणि रुग्णालयात उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वालार पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बॉलिवूडचे ‘हे’ सेलिब्रिटी संरक्षणासाठी स्वतःकडे ठेवतात हत्यार, यादीत प्रसिद्ध सेलिब्रिटी बॉलिवूडचे ‘हे’ सेलिब्रिटी संरक्षणासाठी स्वतःकडे ठेवतात हत्यार, यादीत प्रसिद्ध सेलिब्रिटी
Bollywood Celebs: अभिनेता गोविंदाच्या गुडघ्याला गोळी लागली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना सकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली आहे....
गोविंदाच्या गुडघ्याला लागली गोळी; पहाटेच्या सुमारास नेमकं काय घडलं?
Govinda : आवाजात कंपन… प्रचंड भीती… मानसिक धक्का… गोळी लागल्यावर थेट रुग्णालयातून गोविंदा काय म्हणाला?
सलमान खाननंतर अमिताभ बच्चन यांची सुरक्षेत वाढ, कारण अखेर समोर
अभिनेत्री रवीना टंडनच्या अडचणी वाढल्या, त्या व्हिडीओ संदर्भात चौकशीचे आदेश
एकाच वेळी अनेक पुरुषांना डेट करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, ‘तरुण वयात असल्यामुळे मी…’
गोविंदाला गोळी लागली तेव्हा त्याची पत्नी कुठे होती?; रुग्णालयात कोण घेतंय काळजी?