कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर बीफ खाल्याचा आरोप; 7 विद्यार्थ्यांचे निलंबन

कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर बीफ खाल्याचा आरोप; 7 विद्यार्थ्यांचे निलंबन

ओडिशातील बेरहामपूर येथील सरकारी महाविद्यालयात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांनी गोमांस शिजवून खाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वसतिगृहातील 7 विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. तसेच या विद्यार्थ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. याशिवाय एका विद्यार्थ्याला दंडही ठोठावण्यात आला आहे. या घटनेमुळे महाविद्यालयात तणावाचे वातावरण आहे. या घटनेबाबत पोलीस आता अधिक सतर्क झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण परला महाविद्यालयातील आहे. यासंदर्भात कॉलेजच्या प्रमुख अधिकार्यांनी  अधिसूचना जारी केली आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना बंदी घातलेल्या गोष्टी केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या नियमांविरुद्ध जाऊन विद्यार्थ्यांनी हे कृत्य केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे ते यावेळी म्हणाले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिष्कृत विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याला 2 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणाबाबत बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनीही कॉलेजला भेट देऊन विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या इतर सर्व विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. वसतिगृहात गोमांस शिजवण्याच्या घटनेने अशांतता आणि असुरक्षितता निर्माण झाली आहे. याता इतर विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे संपूर्तण महाविद्यालयाच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करावी. असे या तक्रारीत म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भंडाऱ्यात सरकारी कार्यक्रमात लाडक्या बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज भंडाऱ्यात सरकारी कार्यक्रमात लाडक्या बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज
भंडाऱ्यात महिलांसाठी आयोजित पेटी वाटप कार्यक्रमात झुंबड उडाल्याने महिलांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना...
‘लाडकी बहिण’ ही संपूर्ण योजनाच भ्रष्टाचाराचं कुरण आहे, जितेंद्र आव्हाड यांची टीका
स्वरा भास्कर हिचा हैराण करणारा खुलासा, म्हणाली, फहादसोबतच्या लग्नाबद्दल आई वडिलांना सांगितल्यावर थेट…
अभिनेत्रीसोबत लिपलॉक केल्याने ट्रोल, आता दिसणार थेट ‘बिग बॉस 18’च्या घरात आणि…
यूपीत डॉक्टरचा प्रताप! जखमेला टाके घालताना डोक्यात सर्जिकल सुई ठेवली
चाकरमान्यांसाठी सूचना! 5 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेचे टाईम टेबल बदलणार, वाचा सविस्तर…
मिंधे सरकारचे मोठे अपयश… चाकण एमआयडीसीतून 50 कंपन्या गुजरात, आंध्र प्रदेशला स्थलांतरीत?