लातूरमध्ये विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोन ची नजर, दोन हजार पोलिस बंदोबस्तावर !

लातूरमध्ये विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोन ची नजर, दोन हजार पोलिस बंदोबस्तावर !

श्री गणरायाला निरोप देण्यासाठी विविध गणेश मंडळांनी विसर्जन मिवणुकीची जय्यत तयारी केली आहे. मंगळवारी निघणाऱ्या विसर्जन मिवणुकीसाठी तब्बल दोन हजार पोलीस अधिकारी, अमलदार तैनात करण्यात आले आहे.

लातूर शहरासह जिल्ह्यात जवळपास 1 हजार 328 गणेश मंडळांनी यंदा श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली होती. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला गणेशोत्सवाचा जल्लोष आता अखेरच्या टप्प्यावर आला आहे. मंगळवारी 17 सप्टेंबरला श्री गणरायाच्या मुर्तिचे विसर्जन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी लातूर पोलीस प्रशासनही सज्ज आहे. एकूण 1 हजार 238 गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणूक काढली जाणार आहे. श्री गणेश विसर्जन मिरवणुक काळात लातूर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिस पथके, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस मदत केंद्र, तसेच संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही कॅमऱ्यांची व ड्रोन द्वारे नजर ठेवली जाणार आहे. श्री गणेश मूर्तीचे संकलन करण्यासाठी ठिकाणे निश्चित केली असून, 15 ठिकाणी गणेश मूर्तीचे संकलन होणार आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये विसर्जन मिरवणूक काळात 120 पोलीस अधिकारी, 1250 पोलीस अंमलदार, त्यांच्या मदतीला 950 होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या तुकड्या, दंगा काबू पथकाचे 4 प्लाटून, तसेच शिघ्रकृती दलाचे 2 पथक तैनात करण्यात आले आहेत. तसेच जिल्हयातील 3225 सराईत गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. गणेश मंडळांनी व ईद-ए-मिलाद निमित्त निघणाऱ्या मिरवणुका मध्ये निर्बंधीत डॉल्बी व लेझर बीम चा उपयोग करू नये असे आवाहन लातूर पोलीस दलाकडून करण्यात येत आहे. मिरवणुकीसाठी तैनात असणारे पोलीस अधिकारी-अंमलदार यांचे कडून मिरवणुकीच्या अगोदर आणि मिरवणूक चालू असताना अशा दोन्ही वेळी ध्वनी चाचणी घेण्यात येणार असून त्याबाबत दोषी आढळणारे मंडळाचे पदाधिकारी यांचे विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बॉलिवूडचे ‘हे’ सेलिब्रिटी संरक्षणासाठी स्वतःकडे ठेवतात हत्यार, यादीत प्रसिद्ध सेलिब्रिटी बॉलिवूडचे ‘हे’ सेलिब्रिटी संरक्षणासाठी स्वतःकडे ठेवतात हत्यार, यादीत प्रसिद्ध सेलिब्रिटी
Bollywood Celebs: अभिनेता गोविंदाच्या गुडघ्याला गोळी लागली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना सकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली आहे....
गोविंदाच्या गुडघ्याला लागली गोळी; पहाटेच्या सुमारास नेमकं काय घडलं?
Govinda : आवाजात कंपन… प्रचंड भीती… मानसिक धक्का… गोळी लागल्यावर थेट रुग्णालयातून गोविंदा काय म्हणाला?
सलमान खाननंतर अमिताभ बच्चन यांची सुरक्षेत वाढ, कारण अखेर समोर
अभिनेत्री रवीना टंडनच्या अडचणी वाढल्या, त्या व्हिडीओ संदर्भात चौकशीचे आदेश
एकाच वेळी अनेक पुरुषांना डेट करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, ‘तरुण वयात असल्यामुळे मी…’
गोविंदाला गोळी लागली तेव्हा त्याची पत्नी कुठे होती?; रुग्णालयात कोण घेतंय काळजी?