‘लाडकी बहीण’मुळे निधीअभावी इतर योजनांची फरफट, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीलाही बसतोय फटका

‘लाडकी बहीण’मुळे निधीअभावी इतर योजनांची फरफट, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीलाही बसतोय फटका

राज्य शासनाने निराधार महिला, अनाथ बालके, एक महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध शासकीय योजना सुरू केल्या आहेत. मात्र, मागील दोन महिन्यांपासून ‘लाडकी बहीण’ योजना सुरू झाल्याने या योजनांवर गडांतर आले आहे. ‘लाडकी बहीण’साठीच संपूर्ण शासकीय यंत्रणा कामात जुंपली आहे. तसेच निधीच्या अभावामुळे इतर योजनांच्या लाभार्थ्यांची फरफट सुरू असल्याचे चित्र आहे. याचा फटका शिष्यकृत्तीलाही बसू लागला आहे.

विद्यार्थी देशाचे भविष्य असून, त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शासनस्तरावर विविध शिष्यकृत्ती योजना राबवल्या जात आहेत. शेतकरी, निराधार महिलांना, अनाथ बालके यांना आर्थिक हातभार लाकून सक्षमतेसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. विविध टप्प्यावर त्यांची अंमलबजावणीदेखील सुरू होती. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना जुलैपासून सुरू केली.

स्कातंत्र्यदिनाच्या पूर्कसंध्येपासून या योजनेचे अनुदानही महिलांच्या खात्यावर जमा होत आहे. निधीची तरतूद नसताना योजना जाहीर होताच, त्करित अंमलबजावणी व लाभ दिला गेल्याने शासनाच्या इतर योजनांसाठी निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीवर मर्यादा येत असल्याची चर्चा सर्कत्र सुरू आहे. परिणामी बहुतांश योजनांच्या लाभापासून लाभार्थी वंचित राहिले आहेत. विद्यार्थ्यांच्या पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजनेसह विविध शिष्यवृत्तींचे पैसेदेखील अद्यापि जमा झाले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला लागले आहे. मागील सरकारच्या काळातील प्रोत्साहन अनुदानही खात्यात जमा न झाल्याने लाडक्या बहिणींचे दाजीबादेखील नाराज झाले आहेत.

दरम्यान, ‘लाडकी बहीण’ योजनेतील गैरप्रकाराबाबत माध्यमांनी जागरूकता दाखवल्यानंतर जिह्यातील संबंधित प्रशासन विभाग खडबडून जागा झाला. त्यानंतर दोषींवर कारवाईही झाली आहे.

बालकांचे पोषण की मातांचे अनुदान अंगणवाडी सेविकांपुढे पेच

n ‘लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे सेविका व मदतनीस यांना प्राधान्याने योजनेचे फॉर्म भरावे लागत आहेत. कोणाचा अर्ज मंजूर झाला, किती महिलांना प्रत्यक्ष पैसे मिळाले, काय अडचण आहे, कोणत्या बँकेत पैसे जमा झाले, यांसह योजनेची इत्यंभूत माहिती ठेवावी लागत आहे. इंटरनेट व सर्व्हरच्या तांत्रिक अडचणी येत असल्याने कामकाजाच्या वेळेत बदल करावा लागत आहे. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार अन् त्यांच्या मातांचे अनुदान या दोन्ही विषयांकर काम करताना अंगणवाडीसेविका, मदतनीस यांच्यापुढे मोठा पेच पडत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अभिनेत्रीसोबत लिपलॉक केल्याने ट्रोल, आता दिसणार थेट ‘बिग बॉस 18’च्या घरात आणि… अभिनेत्रीसोबत लिपलॉक केल्याने ट्रोल, आता दिसणार थेट ‘बिग बॉस 18’च्या घरात आणि…
अभिनेत्री निया शर्मा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. निया शर्माची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला...
यूपीत डॉक्टरचा प्रताप! जखमेला टाके घालताना डोक्यात सर्जिकल सुई ठेवली
चाकरमान्यांसाठी सूचना! 5 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेचे टाईम टेबल बदलणार, वाचा सविस्तर…
मिंधे सरकारचे मोठे अपयश… चाकण एमआयडीसीतून 50 कंपन्या गुजरात, आंध्र प्रदेशला स्थलांतरीत?
Uttarakhand Accident – चमोलीमध्ये बद्रीनाथ हायवेवर भाविकांची बस उलटली, 12 जखमी
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्यांविरोधात आता ED कडून गुन्हा दाखल
Photo – निऑन यलो गाऊनमध्ये मृणालचा ग्लॅमरस लूक, चाहते घायाळ