मुसळधार पावसाने उत्तर प्रदेशात हाहाकार, गल्लोगल्ली मगरींची दहशत; 85 घाट गंगेच्या पाण्याखाली

मुसळधार पावसाने उत्तर प्रदेशात हाहाकार, गल्लोगल्ली मगरींची दहशत; 85 घाट गंगेच्या पाण्याखाली

गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसात उत्तर प्रदेश अक्षरशः बुडाले. गंगा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याबाहेर गेली असून तब्बल 85 घाट गंगेच्या पाण्याखाली गेले आहेत. मृतदेह अक्षरशः पाण्यातूनच वाट काढत मणिकर्णिका घाटावर आणण्यात येत असून 5 कॉलनी पाण्याखाली गेल्या आहेत. तब्बल 200 कुटुंबांनी घरे सोडून सुरक्षित स्थळे गाठली असून अजूनही लाखो नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. गल्लोगल्ली मगरींची दहशत असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

पीलभीतमध्ये पाण्याच्या जोरदार प्रवाहात दोन बाइक्सवर तरुण वाहून गेले. तब्बल 2 तासांनी या दोन्ही तरुणांना स्थानिक लोकांनी वाचवले. लखीमपूरमध्ये शारदा नदीही धोक्याच्या पातळीच्या 60 सेंटीमीटरवरून वाहत आहे. पलिया येथे तब्बल 1 लाख अडकले असून 170 हून अधिक गावे पुराच्या पाण्याने वेढली गेली आहेत. कानपूर येथे एका गल्लीत मगर दिसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण होते. या मगरीला स्थानिकांनी मोठय़ा शिताफीने पकडून वन विभागाच्या हवाली केले. अयोध्येतही शरयू नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुरादाबाद-दिल्ली महामार्ग कोसी नदीच्या पाण्याखाली गेला. गोंडा येथे घाघरा नदीदेखील धोक्याच्या पातळीपेक्षा 87 सेंटीमीटरवरून वाहत आहे. त्यामुळे 20 गावे पुराच्या पाण्याने वेढली गेली.

प्रयागराज येथे गंगा नदीला पूर आल्याने थरवई गोंडवा विद्युत उपकेंद्र पाण्याखाली गेले. त्यामुळे अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडीत झाला.

अयोध्येत जुन्या स्मशान घाटाजवळ अक्षरशः नदी झाली. त्यामुळे येथे होणारी पार्किंग बंद करण्यात आली.

महाराजगंज, कुशीनगर, गोरखपूर,  देवरिया, बलिया, महु, आजमगढ, जौनपूर, प्रतापगढ, प्रयागराज, गाजीपुर, आजमगढ, वाराणसी, चंदौली, मिर्जापूर, सोनभद्र, भदोही, प्रयागराज, प्रतापगढ, काwशांबी, चिभकुट, बांदा या 22 जिह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कंगना यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात करावे लागणार हे 13 बदल; सेन्सॉर बोर्डासमोर अभिनेत्रीने घेतलं नमतं कंगना यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात करावे लागणार हे 13 बदल; सेन्सॉर बोर्डासमोर अभिनेत्रीने घेतलं नमतं
अभिनेत्री कंगना राणौत यांनी त्यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात आम्ही सुचवलेले बदल आणि काटछाट करण्यास सहमती दर्शवली असल्याची माहिती सेन्सॉर बोर्डाने...
ऐश्वर्या राय हिच्यासोबत घडला हैराण करणारा प्रकार, अभिनेत्रीला पाहताच ‘त्या’ महिलेने थेट…
लाडका पॅडीदादा घरातून बाहेर जाताच सूरजची भावनिक पोस्ट; नेटकरी म्हणाले, रक्तापलिकडचं नातं…
‘आयफा’मध्ये प्रभू देवासोबत शाहिद कपूरचा धमाकेदार डान्स
मला संसार थाटण्यात रस नव्हता, एकाच वेळी अनेकांसोबत संबंध! अभिनेत्रीने स्वतःच केलं उघड
कुत्र्याच्या गुरगुरण्याला बिबट्या समजला अन् पोलिसांसह वनविभागाच्या यंत्रणेलाही कामाला लावलं
बुलडोझर कारवाईवरून सुप्रीम कोर्टाची आसाम सरकारला नोटीस; ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे निर्देश