एसटीबद्दलच्या तक्रारींसाठी आता महामंडळाची नवीन योजना, प्रत्येक बसगाड्यांच्या आत असणार ही सोय

एसटीबद्दलच्या तक्रारींसाठी आता महामंडळाची नवीन योजना, प्रत्येक बसगाड्यांच्या आत असणार ही सोय

एसटीच्या संबंधीत प्रवाशांच्या असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आता महामंडळाने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. एसटी प्रवासात प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडीअडचणींचा निपटारा करण्यासाठी आता प्रत्येक बसमध्ये आगार व्यवस्थापक आणि स्थानक प्रमुखांचे दूरध्वनी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास करताना प्रवाशांना आलेल्या तक्रारींचा निपटारा करणे सोपे होणार आहे.

एसटीचा प्रवास करताना अनेकदा प्रवाशांच्या अनेक तक्रारी असतात.त्याची दाद कुठे मागायची याची अडचण असते. अनेकदा या संदर्भात परिपत्रकीय सूचना करण्यात आलेल्या आहेत. तरी देखील त्याचे पालन होतेच असे नाही. त्यामुळे आता प्रवाशांना येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी आणि पर्यायाने एसटीची सेवा सुधारण्यासाठी आता एसटीच्या बसमध्येच आगार व्यवस्थापक आणि स्थानक प्रमुखाचे दूरध्वनी क्रमांक एसटीच्या बसच्या प्रदर्शनीय भागात लावण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटीचा चालक अति वेगाने बस चालवित आहे का ? चालक वाहन चालवताना मोबाईल पहात किंवा मोबाईलवर बोलत आहे का ? वाहकाने सुट्टे पैसे परत केले नाहीत का ? वाहकाचे वर्तन असभ्य आहे का ? योग्य थांब्यावर बस थांबविली नाही का ? बसचा तांत्रिक बिघाड झालेला आहे का ? अशा तक्रारी प्रवाशी मुख्यालयाकडे करतात. त्यामुळे एसटीच्या बसमध्ये आता चालकाच्या मागील बाजूस संबंधित आगार व्यवस्थापक आणि स्थानक प्रमुखाचे नाव आणि दूरध्वनी क्रमांक लावण्यातचे आदेश महामंडळाने प्रत्येक आगाराला दिले आहेत.

एसटी प्रवाशांच्या तक्रारींची दखल न घेतल्यास…

21 सप्टेंबरपर्यंत एसटीच्या बसेसमध्ये  दूरध्वनी क्रमांक लावण्याची कारवाई पूर्ण करावी असे परिपत्रक काढण्यात आले आहे. टेलीफोन जर बंद असतील तर ते तातडीने सुरु करावेत असेही या पत्रकात म्हटले आहे. दूरध्वनीवर आलेल्या तक्रारींचा रेकॉर्ड ठेवण्यात यावा आणि त्या प्रमाणे तक्रारींचा निपटारा करण्यात यावा. या कामात कुचराई केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. ही भित्ती पत्रके लावण्यात येणारा खर्च आगार व्यवस्थापकांना असलेल्या आर्थिक खर्चाच्या अधिकारातून करण्यात यावा असे आदेशच उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी सर्व आगारांना दिले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Coldplay कॉन्सर्टच्या तिकीटांवरुन Book My Show च्या सीईओवर मोठा आरोप, अटक होणार का? Coldplay कॉन्सर्टच्या तिकीटांवरुन Book My Show च्या सीईओवर मोठा आरोप, अटक होणार का?
तुम्ही कोल्डप्ले कॉन्सर्टची तिकीट विकत घेण्याचा प्रयत्न केला का? बरेच प्रयत्न करुनही तुम्हाला तिकीट मिळू शकली नाही का? इतकच नाही,...
‘धर्मवीर-2’ सिनेमा पाहू नका… या सिनेमात फक्त… आनंद दिघे यांच्या कुटुंबातीलच व्यक्तीचं थेट आवाहन काय?
Video : वडील पहिल्यांदाच मुंबईत आल्याने ‘कोकण हार्डेट गर्ल’च्या डोळ्यात पाणी
गर्लफ्रेंड असतानाही हृतिक रोशन थेट ‘या’ डेटिंग ॲपवर, अखेर अभिनेत्याकडून…
रणबीर कपूर – कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या तयारीत असलेली बेबो, पण…, व्हिडीओ पाहून म्हणाल…
सलमान खान – अरबाज खान यांच्यात टोकाला पोहोचलेले वाद, ‘मी त्याला पेन्सिलनं भोसकलं, त्यानंतर…’
मुशीर खान अपघातात जखमी; रुग्णालयात उपचार सुरू, मुंबई संघाला धक्का