Vote From Home सुविधेत मतांशी छेडछाड होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाला पत्र

Vote From Home सुविधेत मतांशी छेडछाड होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाला पत्र

लोकसभा निवडणुकीची धामधूम आता सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत घरून मतदान करण्याची सोय देण्यात आली असून त्यावर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. या सुविधेचा गैरफायदा घेऊन मतांशी छेडछाड होण्याची शक्यता आहे, असं पत्र निवडणूक आयोगाला लिहिण्यात आलं आहे.

हे पत्र केरळचे ज्येष्ठ काँग्रेस नेते व्ही. डी. सतीशन यांनी लिहिलं असून त्यावर ठोस उपाय करण्याची मागणीही त्या पत्रात केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी संजय कौल यांना बुधवारी हे पत्र सतीशन यांनी पाठवलं आहे. त्यात ते लिहितात की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांना तसंच दिव्यांग मतदारांना घरून मतदान करण्याची जी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तिचा दुरुपयोग करून मतांशी छेडछाड होण्याची शक्यता आहे, असं सतीशन यांनी म्हटलं आहे.

ही सुविधा केरळ विधानसभेच्या 2021च्या निवडणुकांमध्येही देण्यात आली होती. त्यावेळी या सुविधेचा खूप मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग करण्यात आला. त्यामुळे अशा प्रकारच्या मतदानासाठी फक्त मतदार ओळखपत्रावर विसंबून न राहता मतदाराच्या वयाची पडताळणी करण्यासाठी आधार कार्डासह अन्य दस्तऐवजही अनिवार्य करण्यात यावेत, अशी सूचनाही सतिशन यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रसिद्ध अभिनेत्यावर गंभीर आरोप, फरार अभिनेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, ‘तो’ म्हणाला… प्रसिद्ध अभिनेत्यावर गंभीर आरोप, फरार अभिनेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, ‘तो’ म्हणाला…
बॉलिवूड अभिनेता साहिल खान याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. साहिल खानवर बेटिंग साईट चालवण्याचा आणि सट्टेबाजीला प्रोत्साहन देण्याचा...
अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचं आहे, ज्यासाठी मोजावे लागतील इतके पैसे?
भुजबळांनी माघार घेतली, तू ही घे नाहीतर…अशी धमकी देत ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंच्या गाडीवर शाईफेक
धमक्यांवर निवडून येणार का? जनता कुणाच्या पाठिशी, संजय राऊत यांचा अजितदादा यांच्यावर घणाघात
छगन भुजबळांचा नवीन डाव, महायुतीत असा दबाव आणण्याचा प्रयत्न
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पुणेकरांची मोहीम, मतदान करा अन् असे 50 रुपयांचे पेट्रोल मोफत मिळवा
श्रीकांत शिंदेंनी फक्त रिमॉडलिंगचे बोर्ड लावले, केले मात्र काहीच नाही; वैशाली दरेकर यांचा आरोप