कुछ तो गडबड है! नितेश राणेंचा जामीन रद्द करा; मिंधेंचा कोर्टात अर्ज

कुछ तो गडबड है! नितेश राणेंचा जामीन रद्द करा; मिंधेंचा कोर्टात अर्ज

तिकीट कापाकापीवरून भाजपमध्ये अंतर्गत वाद धुमसत आहे. त्याचप्रमाणे मिंधे सरकारमध्येही ‘कुछ तो गडबड है’ आहे. भाजपचा आमदार असलेल्या नितेश राणे यांचा जामीन रद्द करा, अशी मागणी करत मिंधे सरकारने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. काही दिवसांपूर्वी भडकावू भाषणे दिल्याच्या आरोपावरून नितेश राणेंविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यापाठोपाठ मिंधेंनी नवीन अर्ज करून केंद्रीय मंत्रीपुत्राची गोची केली आहे.

दोन वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावर हल्ला केला होता. तो हल्ला नितेश राणे यांच्याच सांगण्यावरून केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. हल्ला केल्यानंतर अटकेच्या भीतीने नितेश राणे भूमिगत झाले होते. नंतर अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथे दिलासा मिळण्याऐवजी न्यायालयाने त्यांना दहा दिवसांत पोलिसांपुढे शरण येण्याचे आदेश दिले होते, मात्र त्या आदेशानुसार शरण न आल्यामुळे न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. अखेर कणकवली न्यायालयात शरण आल्यानंतर दोन दिवस पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. याचदरम्यान सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तो जामीन रद्द करण्यासाठी मिंधे सरकारने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

हायकोर्टाने बजावली नोटीस

मिंधे सरकारच्या अर्जावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकलपीठाने नितेश राणेंना नोटीस बजावली. सरकारच्या अर्जावर 6 मे रोजी स्वतःची बाजू मांडण्याचे आदेश न्यायालयाने नितेश राणेंना दिले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल…; ‘ये रे ये रे पैसा’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल…; ‘ये रे ये रे पैसा’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर
संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मॅड कॉमेडी असलेला ‘ये रे ये...
तेलुगु आणि कन्नड अभिनेत्रीचे अपघाती निधन
पाकव्याप्त काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती; महागाईविरोधात नागरिक रस्त्यावर
मार्की येथे वीज पडून बैल जोडी ठार , शेतकऱ्यावर ओढवले संकट
भाजप नेत्यांनी संदेशखळीतील महिलांना आंदोलन करण्यासाठी पैसे दिले, व्हायरल व्हिडीओतून दावा
माझीच चूक होती, माझ्यामुळे..; मुलीच्या पहिल्या घटस्फोटाविषयी असं का म्हणाल्या नीना गुप्ता?
प्रायव्हेट व्हिडीओ लीकप्रकरणी चर्चेत आलेली ज्योती राय आहे तरी कोण? काही दिवसांपूर्वी मिळालेली धमकी