निवडणुकीत कार्यकर्त्यांचा वडापाववर ताव! मुंबईच्या जिल्हाधिकाऱयांकडून सुधारित दरपत्रक जारी

निवडणुकीत कार्यकर्त्यांचा वडापाववर ताव! मुंबईच्या जिल्हाधिकाऱयांकडून सुधारित दरपत्रक जारी

लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना 95 लाख रुपये खर्चाची मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. हा खर्च करत असताना प्रचाराच्या वेळी करण्यात येणाऱया खर्चाचे दरही ठरवून देण्यात आले आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात एक प्लेट वडापावसाठी 15 रुपये दर निश्चित करण्यात आल्याने निवडणुकीत कार्यकर्त्यांना उमेदवाराचा प्रचार करताना वडापाववर मनसोक्त ताव मारता येणार आहे.

निवडणुकीत उमेदवारांनी प्रचाराच्या काळात चहा, नाश्ता, जेवण, गाडी तसेच सभेसाठी वापरण्यात येणाऱया खुर्च्या, नेत्यांसाठीच हॉटेल बुकिंग यावर करण्यात येणाऱया खर्चाचे दरपत्रक निवडणूक आयोगाकडून ठरवून देण्यात येते. मुंबई शहर व उपनगर जिह्यातील सहा मतदारसंघांत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जे दर जिल्हा निवडणूक अधिकाऱयांना कळविण्यात आले होते त्यामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून आले होते.

मुंबईत सर्वसाधारणपणे कुठेही 15 रुपयाला मिळणाऱया वडापावसाठी 25 आणि 10 रुपयाला मिळणाऱया चहासाठी 20 रुपये दर  ठरविण्यात आला होता. उपनगरापेक्षा मुंबई शहरात चहा, कॉफी, नाश्ता, शाकाहारी व मांसाहारी जेवण आदींवर करण्यात येणारा खर्च खूपच अधिक असल्याने उमेदवारांच्या खर्चाचा ताळमेळ कसा घालायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे मुंबईच्या जिल्हाधिकाऱयांकडून खर्चाचे सुधारित दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

अर्ज दाखल केल्यापासून हिशोब

ज्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला जातो, त्या दिवसापासून उमेदवाराला  प्रत्येक दिवसाच्या प्रचारासाठी खर्चाची नोंद ठेवावी लागते. दररोज होणारा खर्च एका वहीत लिहून निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक आहे. निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱयांकडून दर आठवडय़ाला खर्चाची तपासणी करण्यात येईल.

 

असे आहे खर्चाचे दरपत्रक

चहा              ः   10 रुपये

कॉफी            ः   12 रुपये

वडापाव        ः   15 रुपये

नाष्टा             ः   25 रुपये

पुरी-भाजी      ः   60 रुपये

पुलाव            ः   75 रुपये

शाकाहारी थाळी    ः       110

मांसाहारी थाळी    ः       140

वाहन व्यवस्था

(24 तास, 100 किमी)

नॉन एसी टॅक्सी ः 2770 रुपये

एसी टॅक्सी     ः   2960 रुपये

इन्होव्हा एसी  ः   5000 रुपये

पन्नास सीटर बस   ः       11, 500

हॉटेल व्यवस्था (प्रतीदिन)

नॉन एसी रूम ः   1650

एसी रूम        ः   3000

फोर स्टार हॉटेल    ः       20,000

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते?; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट काय? देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते?; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट काय?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. फडणवीस हे राज ठाकरे यांना काय म्हणायचे...
मिस्टर राज… टीकेनंतर सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर; रमेश किनी हत्याकांडाचा उल्लेख करत म्हणाल्या…
अजित पवारांना शरद पवार ‘व्हिलन’ बनवत होते, कारण… देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट
‘घरोघरी मातीच्या चुली’मधील ऐश्वर्या-सारंगच्या लग्नातील पैठणी थीमची चर्चा
Amitabh Bachchan : विवाहित असतानाही ‘या’ अभिनेत्यासोबत होतं अमिताभ बच्चन यांच्या लेकीचं अफेअर!
स्टार प्रवाहवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अनेकांची निराशा
‘या’ अभिनेत्रींनी मोडला श्रीमंत पुरुषांचा संसार, त्यानंतर केलं लग्न, एकीची सवत तर प्रसिद्ध अभिनेत्री