अपघातातील मृतांच्या वारसांना 22 वर्षांनंतर न्याय; उच्च न्यायालयाचे विमा कंपनीस पावणेदोन कोटी देण्याचे आदेश

अपघातातील मृतांच्या वारसांना 22 वर्षांनंतर न्याय; उच्च न्यायालयाचे विमा कंपनीस पावणेदोन कोटी देण्याचे आदेश

सैन्य दलातील कॅप्टन शैलेंद्र करंदीकर, त्यांची पत्नी सोनाली, दोन महिन्याचे बाळ, नातेवाईक वैजयंती माधव आखवे या पाचजणांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना 22 वर्षांनंतर न्याय मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाने विमा कंपनीस एक कोटी 75 लाख 88 हजार रुपये भरपाई, त्यावर 2003 पासून साडेसात टक्के दराने व्याज देण्याचा आदेश दिला.

कॅप्टन शैलेंद्र, पत्नी सोनाली, दोन महिन्याचे बाळ सुमेन, नातेवाईक वैजयंती आखवे आणि त्यांचा मुलगा देवधर असे सर्वजण 28 जुलै 2002 रोजी व्हॅनमधून नरसिंहवाडीला गेले होते. देवदर्शन घेऊन परत येताना सांगली आकाशवाणीजवळ समोरून आलेल्या ट्रकने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, व्हॅनमधील देवदत्त आखवेवगळता पाचजणांचा जागीच अंत झाला. त्यामुळे सांगलीवर शोककळा पसरली होती.

अपघातप्रकरणी करंदीकर यांच्या आई-वडिलांनी मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाकडे नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला. 2003 मध्ये सर्वांना मिळून 56 लाख 78 हजार, पाचशे रुपये नुकसानभरपाईचा आदेश दिला. या निकालाविरुद्ध रक्कम वाढवून मिळण्यासाठी करंदीकर व आखवे कुटुंबाकडून मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. विमा कंपनीनेही उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी विमा कंपनीचे अपील फेटाळले. परंतु सांगलीतील न्यायाधिकरणाच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायनिवाडा विचारात घेऊन करंदीकर, आखवे कुटुंबाचे अपील मंजूर केले. वाढीव रक्कम एक कोटी 75 लाख 88 हजार 939 रुपये आणि त्यावर दावा दाखल झालेल्या तारखेपासून साडेसात टक्के व्याजदराने नुकसानभरपाई देण्याचा आदेश विमा कंपनीला दिला. अपघातानंतर मृतांच्या वारसांना 22 वर्षांनंतर उच्च न्यायालयाने न्याय दिल्याच्या घटनेचा विमा कंपनीस मोठा धक्का मानला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्रीचं कार अपघातात निधन, बहिणीसोबत तीन जण गंभीर जखमी प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्रीचं कार अपघातात निधन, बहिणीसोबत तीन जण गंभीर जखमी
झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचं अपघातात निधन झालं आहे. या अपघातात अभिनेत्रीच्या बहिणीसोबत अन्य तीन...
Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE : मतदानाला सुरुवात, महाराष्ट्रात किती जागांवर मतदान?
मुंबई लुटणाऱयांना जेलमध्ये पाठवू! आदित्य ठाकरे यांचा भाजप आणि मिंध्यांना इशारा
विज्ञान-रंजन – हॅट्स ऑफ, व्हॉएजर!
राज ठाकरे परप्रांतीयांच्या लोंढय़ांवर बोलताच मिंध्यांना टेन्शन
मोदींची वाराणसीतील एकाही गावाला ना भेट, ना विचारपूस
रायबरेलीत अमित शहा यांच्या सभेत पत्रकाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सभेसाठी पैसे दिले होते का? विचारताच हल्ला