परीक्षण – विरक्त क्रांतिकारी

परीक्षण – विरक्त क्रांतिकारी

>>संपत मोरे

दक्षिण महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या विरोधात मोठा लढा उभा राहिला. येथील जनतेने महात्मा गांधी यांच्या विचारांचे अधिष्ठान असलेल्या प्रतिसरकारच्या लढय़ाला मोठी साथ दिली. हा लढा उभा राहत असताना अनेक नेत्यांनी योगदान दिले. ाढांतिसिंह नाना पाटील हे या लढय़ाचे प्रमुख म्हणून पुढे आले, पण त्यांच्या पाठी जे अनेक नेते होते, त्यात स्वामी रामानंद भारती होते. स्वामींनी आपल्या आयुष्यात लढय़ाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या जगप्रसिद्ध मिठाच्या सत्याग्रहात सहभाग नोंदवून केली. मैसूर राज्यातील एका खेडय़ातील महाविद्यालयात शिकणारा तरुण देशप्रेमाच्या वेडातून शिक्षण, गाव आणि घर सोडून देशभर फिरतो. संन्यास घेऊन देशासाठी आपलं जीवन सार्थकी लावण्याचा निर्धार करतो. आपल्या हातून देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात जेवढा सहभाग नोंदवत असताना सातारा जिह्यातील काँग्रेस नेता म्हणून पुढे येतो. अखेरपर्यंत सातारा जिह्यात राहून कार्य करत राहतात.

कधीकाळी सातारा जिह्यातल्या राजकारणातील मोठी शक्ती असलेल्या स्वामी रामानंद भारती यांचा इतिहास अलीकडच्या पिढीला फक्त मौखिक परंपरेतून, किस्से आणि गोष्टी रूपाने माहीत होता. अंकुश पाटील यांनी ‘महाराष्ट्राचे शिल्पकार स्वामी रामानंद भारती’ या चरित्राच्या माध्यमातून तो नव्या पिढीसमोर आणला आहे. पूर्वी सातारा जिल्हा सातारा आणि दक्षिण सातारा असा विभागलेला होता. या दोन्हीही सातारा जिह्यांतील राजकीय घडामोडी, प्रसंग, नवीन नेतृत्व उभारणी यात स्वामींचे योगदान होते.स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतल्यावर त्यांनी केलेल्या कामाची विस्तृत नोंद कुठेही नव्हती. सातारा जिह्यात ब्रिटिशांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या चळवळीवर अनेक पुस्तके, ग्रंथ निघाले. या चळवळीत थेट सहभाग असलेल्या योद्धय़ांनीसुद्धा त्यांचे अनुभव कथन समोर आणले, पण या सगळ्यांचे मार्गदर्शक असलेल्या स्वामींबद्दल लिहिताना मात्र नीटसा उल्लेख आलेला नाही.

एका जिज्ञासेतून अंकुश पाटील हे स्वामी रामानंद भारती या उपेक्षेच्या अंधारात गेलेल्या एका विरक्त ाढांतिकारी नेत्यांचा शोध घेत राहिले. स्वामींना पाहिलेली लोक त्यांना भेटली तेव्हा ती या माणसाबद्दल भक्तिभावाने बोलली, त्यांची उपेक्षा डोळ्यांनी पाहिल्याची वेदना त्यांच्या बोलण्यात लेखकाला जाणवली. स्वामींची उपेक्षा या सामान्य माणसांनी पाहिली. त्यांना काहीही करता आले नाही. मात्र त्यांनी स्वामींच्या जपलेल्या आठवणी लेखकाला सांगितल्या. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर स्वामींनी सातारा जिह्यात काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न केला. सातारा जिह्यात एक साधू काँग्रेसचे नेतृत्व करत होते. काँग्रेसचे काम करत पशुहत्या बंद व्हाव्यात, दारूबंदी व्हावी, लोक साक्षर व्हावेत यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.

यशवंतराव चव्हाण, वसंतराव दादा पाटील यांच्या राजकीय जडणघडणीत स्वामींचे मोठे योगदान होते. यशवंतराव चव्हाण यांनी ‘कृष्णाकाठ’मध्ये स्वामींचा उल्लेख केला आहे. वसंतदादा पाटील यांना स्वामींनी मानसपुत्र मानले होते. सांगली जिह्यात सहकारी चळवळीतून उभे राहिलेले सांगली, तासगाव आणि शिराळा हे साखर कारखाने स्वामींच्या मार्गदर्शनाने उभे राहिले. यातील काही कारखान्यांचे मुख्य प्रवर्तक स्वामी रामानंद भारती होते हे वाचून आश्चर्य वाटते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीत स्वामींचा खूप दबदबा होता. सातारा जिह्यातील त्या वेळच्या उमेदवाऱया स्वामींच्या सल्ल्याने दिल्या जात असत. सातारा जिह्यात काँग्रेसचा विचार तळागाळात पोहोचवण्यात त्यांचे मोठे योगदान होते. स्वामींसारख्या काँग्रेसच्या निरपेक्ष शिलेदाराला सर्वत्र काँग्रेसचा प्रभाव असताना लोकसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पराभवाला समोर जावे लागले. ते कसे? याचे उत्तर मुळातून शोधले पाहिजे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांचे मार्गदर्शक असलेल्या स्वामी रामानंद भारती यांचे चरित्र कुठेही उपलब्ध नव्हते.

प्रति सरकारची स्थापना झाल्यावर दक्षिण महाराष्ट्रात स्वातंत्र्य चळवळीसोबत सामाजिक सुधारणा चळवळ उभा राहिली. त्यामध्ये स्वामी रामानंद भारती यांचे मोठे योगदान होते. कधीकाळी काँग्रेस पक्षाची सातारा आणि सांगली (दक्षिण सातारा) या दोन जिह्यांच्या प्रमुखपदाची जबाबदारी पार पाडणारे स्वामी बदलत्या राजकीय परिस्थितीत बाजूला पडले, उपेक्षित राहिले. बेचाळीसच्या ब्रिटिशविरोधी उठावातील सहभाग आणि नंतरच्या सर्व राजकीय घडामोडींचे एक कर्तेधर्ते रामानंद भारती यांची वास्तवातली प्रतिमा बाजूला पडून नव्या पिढीसमोर भगव्या वेशातील संन्याशी साधू अशीच काही लोककथांच्या माध्यमातून आली.

तरुण लेखक अंकुश पाटील यांनी गेली तीन-चार वर्षे अभ्यास करून, मुलाखती आणि कागदपत्रे यांच्या माध्यमातून स्वामी रामानंद भारती यांचे चरित्र समोर आणले आहे. त्यांनी मैलोन्मैल पायपीट करत हे पुस्तक नव्या पिढीच्या हाती दिले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. ओघवत्या शैलीत अंकुश पाटील यांनी राजकारणात संन्यासी राहून लोकश्रद्धेचा विषय ठरलेल्या एका उपेक्षित साधूला आणि एकेकाळी काँग्रेस नेत्यांना मोलाचे धडे देणाऱया मार्गदर्शकाला उजेडात आणले आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार स्वामी रामानंद भारती
लेखक : अंकुश पाटील
प्रकाशक : लोकायत प्रकाशन, सातारा
किंमत : 250

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्या शिवसेनेसोबत 25 वर्षे सत्ता भोगली ती शिवसेना नकली ? मोदी-शाहांवर उद्धव ठाकरेंची कडाडून टीका ज्या शिवसेनेसोबत 25 वर्षे सत्ता भोगली ती शिवसेना नकली ? मोदी-शाहांवर उद्धव ठाकरेंची कडाडून टीका
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्रामात आज देशभरात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. महाराष्ट्रातहा 11 मतदारसंघात आज मतदान होत आहे. मागच्या तीन टप्प्यांप्रमाणे...
घटस्फोटानंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न, सावत्र मुलगीच नाहीतर, स्वतःचा मुलगाही नाही म्हणत आई, कारण…
मनला चटका लावणारा शेवट, स्टेजवर परफॉर्म करताना प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास
भर रस्त्यावर करीना कपूर-सैफ अली खानचा लिप लॉक; व्हिडीओवर भडकले नेटकरी
मी प्रिती झिंटाच्या बॉयफ्रेंडला..; ‘दिल चाहता है’ फेम अभिनेत्रीचं बऱ्याच वर्षांनंतर स्पष्टीकरण
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांसोबत आलेल्या पोलिसांच्या हातामध्ये त्या जड बॅगा कसल्या? ठाकरे गटाचा सवाल, VIDEO
Amol Kolhe : अजितदादा म्हणालेत यावेळी पाडणार, मतदानाच्या दिवशी अमोल कोल्हे म्हणाले…