‘म्हाडा’च्या 17 भूखंडांचा लिलाव पडला लांबणीवर; इच्छुकांना 7 मेपर्यंत निविदा सादर करता येणार

‘म्हाडा’च्या 17 भूखंडांचा लिलाव पडला लांबणीवर; इच्छुकांना 7 मेपर्यंत निविदा सादर करता येणार

दुकानांपाठोपाठ म्हाडाच्या मुंबईतील 17 भूखंडाचा लिलाव आता लांबणीवर पडला आहे. इच्छुकांना आता 7 मेपर्यंत निविदा सादर करता येणार असून जूनच्या पहिल्या आठवडय़ात ई-लिलाव पार पडेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी निविदा सादर करण्याची मुदत 26 एप्रिलपर्यंत होती.

म्हाडाने मार्चमध्ये मुंबईतील मोक्याच्या ठिकाणच्या 17 भूखंडांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मालाड-मालवणी, चारकोप, विक्रोळीतील टागोरनगर आणि कन्नमवार नगर, शीव येथील प्रतीक्षा नगर आणि जोगेश्वरी ओशिवरा येथील भूखंडांची विक्री लिलाव पद्धतीने करण्यात येणार असून या माध्यमातून म्हाडाला तब्बल 375 ते 400 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे रुग्णालय, प्राथमिक शाळा, महाविद्यालय, खेळाचे मैदान, बहुद्देशीय समाज हॉल यासाठी हे भूखंड आरक्षित असून त्या आरक्षणानुसारच या भूखंडाचा वापर करता येणार आहे.

 एक टक्के अनामत रक्कम भरावी लागणार

विविध क्षेत्रफळाच्या या भूखंडाच्या विक्रीसाठी म्हाडाने 45 हजार 300 रुपये प्रति चौरस मीटर ते 1 लाख 6 हजार 170 रुपये प्रति चौरस मीटर दराने बोली निश्चित केली आहे. सर्वाधिक बोली लावणाऱयांना हे भूखंड वितरित करण्यात येतील. इच्छुकांना बोली रकमेच्या एक टक्के अनामत रक्कम इच्छुकांना भरावी लागणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्रीचं कार अपघातात निधन, बहिणीसोबत तीन जण गंभीर जखमी प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्रीचं कार अपघातात निधन, बहिणीसोबत तीन जण गंभीर जखमी
झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचं अपघातात निधन झालं आहे. या अपघातात अभिनेत्रीच्या बहिणीसोबत अन्य तीन...
Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE : मतदानाला सुरुवात, महाराष्ट्रात किती जागांवर मतदान?
मुंबई लुटणाऱयांना जेलमध्ये पाठवू! आदित्य ठाकरे यांचा भाजप आणि मिंध्यांना इशारा
विज्ञान-रंजन – हॅट्स ऑफ, व्हॉएजर!
राज ठाकरे परप्रांतीयांच्या लोंढय़ांवर बोलताच मिंध्यांना टेन्शन
मोदींची वाराणसीतील एकाही गावाला ना भेट, ना विचारपूस
रायबरेलीत अमित शहा यांच्या सभेत पत्रकाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सभेसाठी पैसे दिले होते का? विचारताच हल्ला