मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, लोकलचे नवीन वेळापत्रक जारी

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, लोकलचे नवीन वेळापत्रक जारी

Central Railway Big Update : मुंबईची लाईफलाईन म्हणून मुंबई लोकलला ओळखले जाते. गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यात उशिरा येणाऱ्या ट्रेन, मर्यादित लोकल, लोकल डब्ब्यांची संख्या आणि सातत्याने होणारे तांत्रिक बिघाड यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा सतत खोळंबा होतो. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी काहीशी परिस्थिती मध्य रेल्वेची झाली आहे. मात्र आता मध्य रेल्वेने यावर एक उपाय शोधला आहे. मध्य रेल्वेने नुकतंच एक नवीन वेळापत्रक जारी केले आहे. यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण काही अंशी कमी होणार आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सुधारित वेळेनुसार अनेक लोकल सेवांच्या वेळेत बदल केला आहे. सीएसएमटी – कसारा लोकल दररोज रात्री 12.14 वाजता, तर सीएसएमटी – कर्जत लोकल दररोज रात्री 12.24 वाजता सुटते. पण येत्या 5 ऑक्टोबरपासून सीएसएमटी – कसारा लोकल रात्री 12.08 वाजता, तर सीएसएमटी – कर्जत लोकल रात्री 12.12 वाजता सोडण्यात येणार आहे. या दोन्हीही लोकल 6 ते 12 मिनिटे लवकर सुटणार आहेत.

तसेच मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील 24 अप आणि डाऊन लोकल फेऱ्या परळपर्यंत विस्तारित करण्यात आल्या आहेत. तर सीएसएमटी – ठाणे चालवण्यात येणाऱ्या 6 अप आणि डाऊन लोकल फेऱ्या कल्याणपर्यंत विस्तारित करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी येथील गर्दी कमी व्हावी, यासाठी 22 अप आणि डाऊन जलद लोकल फेऱ्या दादरपर्यंत चालवण्यात येणार आहे. या लोकल दादरवरुन डाऊन दिशेला रवाना होतील.

गर्दीच्या वेळी जलद लोकलला कळवा, मुंब्र्यात थांबा

त्यानंतर दादर येथील नवीन फलाट क्रमांक 11 वरून या लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. तसेच गर्दीच्या वेळी जलद लोकलला कळवा, मुंब्रा या ठिकाणीही थांबा देण्यात आला आहे. तसेच गर्दीच्या वेळी सकाळी 8.56 वाजता कळवा येथे आणि सकाळी 9.23 वाजता मुंब्रा येथे जलद लोकल थांबेल. तर, गर्दीच्या वेळी सायंकाळी 7.29 वाजता कळवा आणि सायंकाळी 7.47 वाजता मुंब्रा येथे जलद लोकलचे अतिरिक्त थांबे निश्चित केले आहेत. सकाळी 6.03 च्या कुर्ला-कल्याण लोकलचे वातानुकूलित लोकलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे 5 ऑक्टोबरपासून ही लोकल सकाळी 6.05 वाजता कुर्ला येथून सुटेल आणि कल्याण येथे सकाळी 7.04 वाजता पोहचेल.

सकाळी 6.03 च्या कुर्ला-कल्याण लोकलचे वातानुकूलित लोकलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे 5 ऑक्टोबरपासून ही लोकल सकाळी 6.05 वाजता कुर्ला येथून सुटेल आणि कल्याण येथे सकाळी 7.04 वाजता पोहचेल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एका झटक्यात होणार कॅन्सरचे निदान, IIT कानपुरने तयार केले डीव्हाईस एका झटक्यात होणार कॅन्सरचे निदान, IIT कानपुरने तयार केले डीव्हाईस
आता कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचे जर झटपट निदान झाले तर उपचार लवकर सुरु करता येतात आणि रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य...
मिंधे सरकार हे महिलाविरोधी सरकार, पुणे प्रकरणावरून नाना पटोले यांची टीका
मुंबईचा वंडर बॉय आणि Team India चा कर्णधार रोहित शर्मा इथेही अव्वल, विराटचा कोहलीचा विक्रम मोडला
Israel Palestine Conflict – तीन महिन्यांपूर्वी हमासच्या तीन प्रमुख नेत्यांना संपवलं, इस्त्रायलचा मोठा दावा
Central Railway Update – मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक, कळवा-मुंब्रा वासियांसाठी गुड न्यूज
मेहकर येथे शिवसेनेचा गद्दार व शासनाच्या विरोधात विक्रमी मोर्चा
आधी भाजप उमेदवारासाठी प्रचार, मग तासाभरात काँग्रेस प्रवेश