‘त्यावेळी’ महाराष्ट्रात फक्त भाजपचंच सरकार येणार, अमित शाह यांचं मोठं विधान

‘त्यावेळी’ महाराष्ट्रात फक्त भाजपचंच सरकार येणार, अमित शाह यांचं मोठं विधान

“महाराष्ट्रात 2024 ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे”, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत. अमित शाह यांनी त्यापुढे जाऊन आणखी एक मोठं वक्तव्य केलं. “2024 मध्ये महायुतीचं आणि 2029 मध्ये केवळ भाजपच्याच जीवावर महाराष्ट्रात सरकार आणू. त्यावेळी एकट्या कमळाचं सरकार असेल”, असं मोठं विधान अमित शाह यांनी केलं. भाजपचा मुंबईत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात अमित शाह यांनी कार्यकर्त्यंना संबोधित करताना संबंधित वक्तव्य केलं. अमित शाह यांच्या या वक्तव्याला जास्त महत्त्व आहे. कारण महाराष्ट्रात दोन प्रादेशिक पक्षांमध्ये मोठी फूट पडली आहे. या दोन्ही पक्षांचा एक गट सध्या सत्ताधारी भाजपसोबत महायुतीत आहे. असं असताना अमित शाह यांनी 2024 च्या निवडणुकीत आणि 2029 च्या निवडणुकीत केवळ कमळाच्या जीवावर भाजपचं सरकार येईल, असं वक्तव्य केल्याने मग त्यावेळी महायुतीमधील इतर मित्रपक्षांचं काय होईल? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

अमित शाह नेमकं काय म्हणाले?

“जे सरकार काम करतं तेच निवडणूक जिंकतात, आपण केंद्रात सलग तिसरे सरकार बनवले. आपली निराशा झटकून टाका. कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका. मी सांगतो राज्यात भाजपचं सरकार होईल. त्यासाठी जोमात काम करा. यंदा 2024 ला महायुतीचे सरकार येईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. २०२९ मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचे आहे. यंदा फक्त ऐका, २०२४ मध्ये युतीचे सरकार असेल. पण २०२९ मध्ये शुद्ध रुपाने कमळचे सरकार असेल”, असं मोठं वक्तव्य अमित शाह यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अमित शाह यांच्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना

“६ लोकसभा अशा आहेत जिथे ६ विधानसभांमध्ये आपल्याला बहुमत होते. पण १ ठिकाणी ते बहुमत घेऊन जिंकले. याचा अर्थ ६ विधानसभा आपण जिंकू तर एकच ते जिंकतील. याचा अर्थ समजतोय ना?”, असा सवाल अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना केला. महाराष्ट्र प्रदेश जी योजना आखेल ती कार्यान्वित करा. मंडल आणि वॉर्ड स्तरावर योजना पोहोचवा. विजय आपलाच असेल, असा कानमंत्र अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना दिला.

“१० टक्के मतदान वाढवा. सराकर आपले आहे. त्यामुळे आपल्याविरुद्ध नाराजी असेल. नगरसेवक, आमदार आणि खासदार विरोधात असलेली नाराजी दूर करा. बूथवर आपल्याला १० कार्यकर्ते पाहिजेत. दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बुथच्या कक्षेत फिरत राहतील”, अशा सूचना अमित शाह यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी ! मनोज जरांगे हेच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; कुणी केली ही घोषणा? मोठी बातमी ! मनोज जरांगे हेच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; कुणी केली ही घोषणा?
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट समाजातील विविध नेते घेत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू राजरत्न आंबेडकर...
सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आहे ही मराठमोळी अभिनेत्री, लग्न करण्यापूर्वी ठेवली होती ही अट
‘बिग बॉस मराठी सीजन 5’च्या निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप, थेट सूरज चव्हाणला..
Ind Vs Ban Test Series 2024- आमची 100 धावांवर बाद होण्याची तयारी होती…; रोहित शर्मा स्पष्टचं बोलला
फडणवीसांच्या पोस्टरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो ताटातील चटणीसारखा, अंबादास दानवे यांचा जबरदस्त टोला
सुंदर संतती प्राप्तीसाठी वहिनी दिरासोबत पळाली, पतीची पोलिसात धाव
दसर्‍याच धुणे धुण्यासाठी गेलेल्या पतीचा तलावात बुडून मृत्यू, पत्नीला वाचविण्यात नागरिकांना यश