अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका, कोण आहे याचिकाकर्ता?

अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका, कोण आहे याचिकाकर्ता?

akshay shinde encounter: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर काही दिवसांपूर्वी झाले होते. त्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. दुसरीकडे  या प्रकरणावर मुंबई उच्च न्यालालयाने राज्य शासनाला चांगलेच फटकारले होते. न्यायालयाकडून अनेक प्रश्न उपस्थित करत एन्काऊंटरसंदर्भात शंका उपस्थित केली होती. उच्च न्यायालय या प्रकरणावर तीन ऑक्टोंबर रोजी सुनावणी करणार आहे. त्यापूर्वी मुंबईतील एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या वकिलाने जनहित याचिका दाखल करत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली आहे.

कोणी केली मागणी

मुंबईतील वकील घनश्याम उपाध्याय हे अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. त्यांनी या प्रकरणात जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची निर्मिती करा, अशी मागणी जनहित याचिकेतून करण्यात आली आहे.

या ही केल्या मागण्या

अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटर प्रकरणी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करणे, या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून करावा, त्या एसआयटीत केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) मधील अधिकाऱ्यांचा समावेश असावा, पोलीस कर्तव्य बजावताना बॉडी कॅमच्या वापराद्वारे पोलीस अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांना द्यावेत, अशा मागण्याही घनश्याम उपाध्याय यांनी याचिकेत केल्या आहेत.

सीबीआयकडे तपास देण्यास विरोध

घनश्याम उपाध्याय यांनी याचिकेते तपास पूर्णपणे सीबीआयकडे देण्यास विरोध केला आहे. कारण नुकतेच सर्वोच्च न्यायालयानेही काही प्रकरणांमध्ये सीबीआयला ‘पिंजऱ्यात बंदिस्त पोपटा’ म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी आणि त्या एसआयटीत सीबीआयचे अधिकारी असावे, असे त्यांनी सुचवले आहे. तसेच या एसआयटीचे नेतृत्व सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांनी करावे, असे म्हटले आहे.

23 सप्टेंबर रोजी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर झाले होते. त्याला तळोजा कारागृहातून दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस ठाण्याकडे नेत असताना त्याने एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावली होती. त्यानंतर गोळीबार केले होता. त्याला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा…
अक्षयने आधी शिवी दिली, मग हवालदार तावडेंच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या…एन्काऊंटर करणाऱ्या इन्स्पेक्टर संजय शिंदे यांनी सांगितले नेमके काय घडले?

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Coldplay कॉन्सर्टच्या तिकीटांवरुन Book My Show च्या सीईओवर मोठा आरोप, अटक होणार का? Coldplay कॉन्सर्टच्या तिकीटांवरुन Book My Show च्या सीईओवर मोठा आरोप, अटक होणार का?
तुम्ही कोल्डप्ले कॉन्सर्टची तिकीट विकत घेण्याचा प्रयत्न केला का? बरेच प्रयत्न करुनही तुम्हाला तिकीट मिळू शकली नाही का? इतकच नाही,...
‘धर्मवीर-2’ सिनेमा पाहू नका… या सिनेमात फक्त… आनंद दिघे यांच्या कुटुंबातीलच व्यक्तीचं थेट आवाहन काय?
Video : वडील पहिल्यांदाच मुंबईत आल्याने ‘कोकण हार्डेट गर्ल’च्या डोळ्यात पाणी
गर्लफ्रेंड असतानाही हृतिक रोशन थेट ‘या’ डेटिंग ॲपवर, अखेर अभिनेत्याकडून…
रणबीर कपूर – कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या तयारीत असलेली बेबो, पण…, व्हिडीओ पाहून म्हणाल…
सलमान खान – अरबाज खान यांच्यात टोकाला पोहोचलेले वाद, ‘मी त्याला पेन्सिलनं भोसकलं, त्यानंतर…’
मुशीर खान अपघातात जखमी; रुग्णालयात उपचार सुरू, मुंबई संघाला धक्का