‘बिग बॉस मराठी सीजन 5’ची अंतिम तारीख जाहीर, या दिवशी पार पडणार सोहळा

‘बिग बॉस मराठी सीजन 5’ची अंतिम तारीख जाहीर, या दिवशी पार पडणार सोहळा

बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे. अनेक दिग्गज कलाकार या सीजनमध्ये सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांमध्येही मोठी क्रेझ सीजनबद्दल आहे. रितेश देशमुख या सीजनला होस्ट करतोय. रितेशचा अंदाज प्रेक्षकांना आवडताना दिसतोय. सुरूवातीच्या काळात वर्षा उसगांवकर विरोधात निकी तांबोळी असा सामना बिग बॉसच्या घरात रंगताना दिसला. मात्र, आता निकी तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांची जवळीकता वाढताना दिसतंय. दुसरीकडे या आठवड्याच्या नॉमिनेशनमध्ये अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलाय. यावेळी निकी तांबोळी ही ढसाढसा रडताना दिसली.

आता नुकताच बिग बॉसच्या निर्मात्यांनी घरातील सदस्यांना मोठा धक्का दिल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉसने मोठे बदल यंदाच्या सीजनमध्ये केले आहेत. हे सीजन 100 दिवसांचे नसणार असल्याचे बिग बॉसच्या निर्मात्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय. हेच नाही तर थेट फिनालेची तारीखही जाहीर करण्यात आलीये.

बिग बॉसच्या निर्मात्यांकडून घरातील सदस्यांना सांगण्यात आले की, आता फिनालेला अवघे 14 दिवस शिल्लक आहेत. 6 ऑक्टोबर 2024 रोजी बिग बॉस मराठी सीजन 5 चा फिनाले पार पडेल. यामुळे घरातील सदस्यांच्या हातामध्ये आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. फिनाले विकमध्ये कोण राहणार हे समजेल असेही सांगण्यात आलंय.

म्हणजेच काय तर आता बिग बॉस फक्त 14 दिवस असणार आहे. त्यानंतर थेट 6 तारखेला बिग बॉस मराठी सीजन 5 ला त्याचा विजेता मिळेल. आता प्रेक्षकांना पुढील काही दिवस फुल मनोरंजन बघायला मिळणार आहे. कोण होणार बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता हे अवघ्या 14 दिवसांमध्येच कळेल.

अभिजीत सावंत आणि वर्षा उसगांवकर यांच्याकडे विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून बघितले जाते. वर्षा उसगांवकर या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसत आहेत. सुरूवातीपासूनच बिग बॉसच्या घरात दोन ग्रुप हे बघायला मिळाले. या सीजनने टीआरपीमध्ये धमाल केली. अरबाज पटेल बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सर्वजण हैराण झाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तेव्हाच पीडित मुलींचा ‘बदला… पुरा’ होईल, अमित ठाकरे यांचे थेट प्रश्न कुणाला?, ट्विट का होतेय व्हायरल? तेव्हाच पीडित मुलींचा ‘बदला… पुरा’ होईल, अमित ठाकरे यांचे थेट प्रश्न कुणाला?, ट्विट का होतेय व्हायरल?
बदलापूरमधील नामांकित शाळेमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. अक्षय शिंदे याचा सेल्फ...
Akshay Shinde Encounter : आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटरचा झाला की केला? मोठी अपडेट समोर
‘बिग बॉस मराठी सीजन 5’ची अंतिम तारीख जाहीर, या दिवशी पार पडणार सोहळा
Akshay Shinde Encounter आज जे घडलं ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद – आदित्य ठाकरे
बिग बॉस मराठी 70 दिवसात संपणार, या दिवशी होणार ग्रँड फिनाले
Badlapur Sexual Assault अक्षय शिंदेबाबत गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे – शरद पवार
Akshay shinde Encounter : आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…