Laapataa ladies : ‘लापता लेडीज’च्या शिरपेचात मानाचा तुरा, भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत एंट्री

Laapataa ladies : ‘लापता लेडीज’च्या शिरपेचात मानाचा तुरा, भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत एंट्री

प्रसिद्ध दिग्दर्शक किरण राव हिने दिग्दर्शित केलेल्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धूमाकूळ माजवला. फक्त क्रिटीक्स नव्हे तर लोकांनाही हा चित्रपट खूप आवडला, त्याचे प्रचंड कौतुकही झाले. आता या चित्रपटाच्या क्रू साठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. भारताकडून ऑस्करसाठी ‘लापता लेडीज’ ची निवड झाली आहे. 2025 च्या ऑस्कर पुरस्कारासाठी लापता लेडीज चित्रपटाची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्श, कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर क्रू यांच्यासाठी हा अतिशय आनंदाचा , अभिमानाचा क्षण आहे.

 

97 व्या अकादमी पुरस्कार (ऑस्कर 2025) साठी भारतातर्फे किरण राव हिने दिग्दर्शित केलेल्या ‘लापता लेडीज’ची एंट्री झाली आहे. सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ‘द फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या सदस्यांनी अकादमी पुरस्कारांसाठी भारताच्याफ् अधिकृत प्रवेशाची घोषणा केली आहे. आमिर खान प्रॉडक्शन अंतर्गत बनलेल्या या चित्रपटात प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव आणि नितांशी गोयल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात रवी किशन आणि छाया कदम यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

29 चित्रपटांना टाकलं मागे

पितृसत्ताक पद्धतीवर हलक्या-फुलक्या पद्धतीने टिप्पणी करणारा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट 29 चित्रपटांच्या यादीतून ऑस्करसाठी निवडण्यात आला. या यादीत बॉलिवूडचा ‘ॲनिमल’, राष्ट्रीय पुरस्कार विजता मल्याळम चित्रपट ‘आट्टम’ आणि कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये चर्चेत आलेला ‘ऑल वुई इमॅजिन इज लाइट’ या चित्रपटांचा समावेश होता. आसामी दिग्दर्शक जाह्नू बरुआ यांच्या अध्यक्षतेखालील 13 सदस्यांच्या निवड समितीने एकमताने आमिर खान आणि किरण राव निर्मित ‘लापता लेडीज’चा अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीत समावेश करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाने तमिळ चित्रपट ‘महाराजा’, तेलुगू चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ आणि ‘हनु-मान’ यांनाही मागे टाकले आहे. 29 चित्रपटांच्या यादीत ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ आणि ‘अनुच्छेद 370’ यांचाही समावेश होता.

गेल्या वर्षी या चित्रपटाची झाली होती घोषणा

गेल्या वर्षी, ‘2018: एव्हरीवन इज अ हिरो’ या मल्याळम सुपरहिट चित्रपटाचा ऑस्करमध्ये भारतातर्फे अधिकृत एंट्री झाली होती. मात्र या चित्रपटाला यश मिळाले नाही.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सलमान खान सोबत भिडण्याची ताकद ऐश्वर्यामध्येच होती – प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य सलमान खान सोबत भिडण्याची ताकद ऐश्वर्यामध्येच होती – प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
अभिनेता सलमान खान याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत भाईजानचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सलमान खान याच्या...
अशोक सराफ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; झळकणार नव्या मालिकेत
सना खानने 7 वर्षांनी लहान मौलानाशी लग्न का केलं? अखेर केला खुलासा
17 वर्षांच्या करियरमध्ये 450 सिनेमे, आजही अभिनेत्रीच्या मृत्यूचं रहस्य गुलदस्त्यात, घटना धक्क करणारी
दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठे वादळ, रडत म्हणाली, माझ्या मुलाला…
Oscars 2025 – ‘लापता लेडीज’ या सिनेमाची ऑस्कर 2025 मध्ये धमाकेदार एन्ट्री; ‘या’ श्रेणीत मिळाले नामांकन
देशातील 20 नद्या एकमेकींना जोडणार; ‘नाम’च्या वर्धापनदिन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पाटील यांची माहिती