75 वर्षांत निवृत्त होण्याचा नियम मोदींना लागू नाही का? केजरीवाल यांचा मोहन भागवत यांना सवाल

75 वर्षांत निवृत्त होण्याचा नियम मोदींना लागू नाही का? केजरीवाल यांचा मोहन भागवत यांना सवाल

देशात सध्या सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून दुसरे राजकीय पक्ष फोडण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तसेच 75 वर्षांत निवृत्त होण्याचा नियम मोदींना लागू नाही का? असा सवालही पुढे केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना केला आहे. दिल्लीतील जंतरमंतर मैदानात आयोजित जाहीर सभेत केजरीवाल बोलत होते.

तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांची सरकारे पाडली जात आहेत. मोदींचे हे कारस्थान हिंदुस्थानच्या लोकशाहीसाठी योग्य आहे का? हे लोकशाहीसाठी घातक नाही का? असा सवाल आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारला आणि मोदी सरकारच्या दडपशाहीच्या राजकारणावर सडकून टीका केली आहे.

लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि कलराज मिश्रा यांच्यासारखे नेते 75 वर्षात निवृत्त झाले. निवृत्तीचा हा नियम मोदींना का लागू होत नाही? असा खडा सवालही त्यांनी मोहन भागवत यांना यावेळी विचारला.

अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा केल्यानंतर जंतरमंतर मैदानावर पहिलीच जाहीर सभा घेतली. या सभेत केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच येत्या निवडणुकीत आपला मतदान करण्याचे आवाहनही केजरीवाल यांनी केले.

भाजपने मला भ्रष्ट आणि चोर म्हटले याचे वाईट वाटले. मला सत्ता आणि खुर्चीचा लोभ नाही. दिल्लीची निवडणूक ही माझी लिटमस टेस्ट आहे. मी प्रामाणिक वाटत असेल तरच मतदान करा, असे आवाहन केजरीवाल यांनी जाहीर सभेतून केले आहे.

निवडणुका प्रामाणिकपणे लढवता येतात आणि जिंकताही येतात. 4 एप्रिल 2011 रोजी जंतरमंतर येथून भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू झाले. निवडणूक जिंकण्याचे आव्हान होते. इतर पक्षांना निवडणुकीसाठी पैशांची, गुंडांची गरज लागते. आमच्याकडे काही नव्हते. मात्र आम्ही निवडणूक लढवली आणि जनतेने आम्हाला विजयी केले. पहिल्यांदा आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाले. निवडणूक प्रामाणिकपणे लढवता येते आणि जिंकताही येते हे आम्ही सिद्ध केले, असे केजरीवाल पुढे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोट्यवधी संपत्ती असलेला ‘हा’ अभिनेता होणार कपूर खानदानाचा जावई?, इशाऱ्यामध्येच… कोट्यवधी संपत्ती असलेला ‘हा’ अभिनेता होणार कपूर खानदानाचा जावई?, इशाऱ्यामध्येच…
बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलीये. खुशी कपूर हिचा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला...
नेपाळमध्ये हिंदुस्थानी सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरवर सामुहिक बलात्कार, चार जणांसह दोन नेपाळींना अटक
Nagar News – कोपरगाव-नगर महामार्गावर कंटेनर-दुचाकीचा अपघात, एक ठार; एक गंभीर जखमी
45th Chess Olympiad – हिंदुस्थानने रचला इतिहास; बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये जिंकले पहिले सुवर्ण पदक, स्लोव्हेनियाचा केला पराभव
नगरमध्ये 23 ते 25 सप्टेंबरला जोरदार पावसाचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
सहावीच्या विद्यार्थ्यावर दंगल आणि हत्येचा गुन्हा दाखल, UP पोलिसांचा अजब कारभार
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक कधी? निवडणूक आयोगाच्या दौऱ्यानंतर तारीख जाहीर होण्याची शक्यता