दहशतवाद्यांकडून विमान हायजॅक तरीही महिलेनं रोज केला मेकअप..; फ्लाइट इंजीनिअरकडून खुलासा

दहशतवाद्यांकडून विमान हायजॅक तरीही महिलेनं रोज केला मेकअप..; फ्लाइट इंजीनिअरकडून खुलासा

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली ‘आयसी 814: द कंदाहार हायजॅक’ ही वेब सीरिज चांगलीच चर्चेत आहे. 1999 मध्ये काठमांडूहून निघालेलं इंडियन एअरलाइन्सचं विमान दहशतवाद्यांनी हायजॅक केलं होतं. विमान आणि त्यातील प्रवासी हे जवळपास आठवडाभर दहशतवाद्यांच्या ताब्यात होते. त्या विमानातील अनेक प्रवाशांना त्या काळात विविध अनुभव आले होते. ‘IC 814 हायजॅक्ड: द इन्साइड स्टोरी’ या पुस्तकात फ्लाइट इंजीनिअर अनील के. जग्गिया यांनी काही अनुभव लिहिले आहेत. त्यापैकीच एक आश्चर्यकारक घटना म्हणजे एका जपानी महिला प्रवासीवर हायजॅकिंगच्या त्या भयंकर घटनेचा जराही परिणाम झाला नव्हता. त्या सातही दिवसांत ती दररोज तिचा मेकअप करत होती आणि रात्री झोपण्यापूर्वी कपडे बदलत होती, असं जग्गिया यांनी पुस्तकात लिहिलंय.

अमृतसर, लाहोर, दुबईनंतर दहशतवाद्यांनी हायजॅक केलेलं विमान तालिबानचं राज्य असलेल्या कंदाहारला नेलं होतं. कंदाहारला विमानाचं लँडिंग झाल्यानंतर कॉकपीट क्रूला पॅसेंजर एरियामध्ये हलवलं गेलं होतं. त्यावेळी जग्गिया त्या जपानी महिलेचं वागणं पाहून चकीत झाले होते. या पुस्तकात त्यांनी लिहिलंय, “माझ्या खुर्चीपासून दोन जागा सोडून उजवीकडे दोन महिला बसल्या होत्या. त्यापैकी एक जपानी आणि एक नेपाळची होती. हायजॅकिंगच्या घटनेनं सर्वजण घाबरले असता त्या जपानी महिलेला आपल्या आजूबाजूला काय घडतंय, याची जराही चिंता वाटत नव्हती. ती ‘रिडर्स डायजेस्ट’ हे पुस्तक वाचत होती. पुस्तक वाचल्यानंतर काही वेळाने ती तिचे कपडे बदलायला टॉयलेटमध्ये जायची. त्यानंतर पुन्हा जागेवर बसून तिचं मेकअप करत बसायची. दररोज दुपारी ती हेच करत होती. त्यानंतर रात्री दररोज ती पुन्हा तिचे कपडे बदलायला जायची. मग जागेवर परत येऊन तिची सीट मागे खेचून झोपायची.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

जग्गिया यांनी जेव्हा त्या महिलेला याबाबत विचारलं, तेव्हा तिचं उत्तर ऐकून ते थक्क झाले होते. “कंदाहारमध्ये आम्ही सात दिवस होतो आणि त्या सातही दिवसांत त्या महिलेनं तिचं रुटीन पूर्ण केलं होतं. दुपारी कपडे बदलून यायची, मेकअप करायची. पुन्हा रात्री कपडे बदलायची आणि झोपी जायची. जेव्हा मी तिला याबद्दल विचारलं तेव्हा ती मला म्हणाली, मी कशाला चिंता करू? जे घडायचं असतं ते घडतंच”, असं जग्गिया यांनी पुढे लिहिलं.

ज्यादिवशी दहशतवादी आणि भारतीय अधिकारी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी प्रवाशांना सोडण्याचं आश्वासन दिलं, तेव्हा विमानातील सर्व प्रवाशांमध्ये जल्लोष सुरू झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. “आपली सुटका होणार हे कळताच सर्व प्रवाशी खुश झाले. ते एकमेकांसोबत आठवणीतल्या वस्तूंची देवाणघेवाण करत होते. काहींनी तर तिथे जोड्यांची जुळवाजुळव करण्यासही सुरुवात केली होती. एका नेपाळी प्रवाशासोबत जपानी महिलेची जुळवाजुळव करण्यासाठी ते प्रयत्न करत होते”, असाही अनुभव त्यांनी पुस्तकात लिहिला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashatra CM : उदंड झाले भावी मुख्यमंत्री; विधानसभेपूर्वीच चर्चा रंगली, पण जनतेच्या मनात कोण व्यक्ती? आजी-माजीच नव्हे तर नवख्यांची पण फौज उभी Maharashatra CM : उदंड झाले भावी मुख्यमंत्री; विधानसभेपूर्वीच चर्चा रंगली, पण जनतेच्या मनात कोण व्यक्ती? आजी-माजीच नव्हे तर नवख्यांची पण फौज उभी
विधानसभा निवडणूक 2024 चे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. विविध मुद्दे, आरोप-प्रत्यारोप, गौप्यस्फोटाने राजकारण तापलं आहे. यंदाच्या विधानसभेसाठी पक्षांची संख्या...
जागावाटपाचं सूत्र नेमकं काय ठरलं? काँग्रेस प्रदेशाध्यांकडून महत्त्वाची माहिती, मविआत काय घडतंय?
वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल ‘या’ अभिनेत्रीने केला हैराण करणारा खुलासा, थेट म्हणाली, मला माहितीच…
सरकार येईल की नाही माहित नाही, पण आठवले पुन्हा मंत्री होतील; गडकरी यांची गॅरंटी
तिरुपती लाडूचा वाद चिघळला, माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केला आरोप
पंजाबमध्ये आईस फॅक्टरीत गॅस गळती, एकाचा गुदमरून मृत्यू; सहा जणांची सुखरुप सुटका
गणपती विसर्जनादरम्यान भाविकांची बोट समुद्रात उलटली, सुदैवाने जीवितहानी टळली