Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : मनसे कार्यकर्त्याला हार्टअटॅक की हत्या? CCTV फुटेज समोर

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : मनसे कार्यकर्त्याला हार्टअटॅक की हत्या? CCTV फुटेज समोर

तोडफोड ते रुग्णालय…सीसीटीव्हीचा घटनाक्रम. तारीख 30 जुलै, दुपारी 2. 40 मनसैनिकांचा अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला, मालोकार मात्र बाजूला होता, त्यानं सहभाग घेतला नाही. तारीख 30 जुलै, दुपारी 2. 56 तोडफोडीनंतर मनसेचे कर्णबाळांसह मालोकार आणि इतर लोक राजहंस धाब्यावर पोहोचले. तारीख 30 जुलै, दुपारी 3.08 काही वेळानं सर्व जण धाब्यासमोरच्या पेट्रोलपंपावर पुन्हा परत भेटतात. तारीख 30 जुलै, संध्या. 5.04 प्रकृती बिघडलेल्या जय मालोकारला केयर रुग्णालयात आणलं जातं.

नेमकं काय आहे प्रकरण?

दोन महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी अजित पवारांवर केलेल्या विधानावर मिटकरींनी टीका केल्यामुळे अकोल्यात मनसेनं मिटकरींची गाडी फोडली. त्यावेळी मनसे समर्थक आणि वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण जय मालोकार बाजूला उभा होता. तोडफोडीच्या काही वेळेतच मालोकारचा अटॅकमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं. मात्र त्यावेळी मनसेनंच मालोकारला मारहाण केल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला होता. दुसरीकडे तोडफोड प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर मनसेचे पदाधिकारी फरार झाले होते. त्याच प्रकरणाला आता नवीन वळण मिळालंय.

विदर्भ दौऱ्यावेळी राज ठाकरेंनी मालोकार कुटुंबियाच्या सांत्वनासाठी पोहोचले. त्यावेळी राज ठाकरेंपुढे आपल्या मुलाचा मृत्यू कसा झाला, याच्या चौकशीची मागणी मालोकार यांच्या आईनं केली होती. तेव्हा राज ठाकरेंनी डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये मालोकारचा मृ्त्यू हार्ट अटॅकनं झाल्याचं सांगत मनसे समर्थकाच्या आईचं सांत्वन केलं होतं. पण आता प्रत्यक्षात पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये मारहाणीमुळे मालोकारचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानं हार्ट अटॅकमुळे मृत्यूचा रिपोर्ट देणारं कोण होतं., त्यांच्यावर कुणाचा दबाव होता. हा देखील प्रश्न विचारला जातोय.

पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये म्हटलंय की जय मालोकारच्या पाठीवर, छातीवर डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण झाली. छातीच्या चार ते पाच बरगड्या फ्रॅक्चर होत्या. डोक्यालाही गंभीर इजा आणि मेंदूला सूज होती. मानेवरच्या मज्जातंतूना गंभीर दुखापतही झाली होती. त्यामुळे इतक्या जखमा असूनही डॉक्टरांनी मालोकारच्या मृत्यूचं कारण हार्टअटॅक का सांगितलं? डॉक्टरांवर कुणाचा दबाव होता का? पोलिसांनाही मान-पाठ-छाती आणि अंगावरच्या जखमा दिसल्या नाहीत का? मिटकरींच्या गाडी तोडफोडीत सहभागी न झालेल्या मालोकारला नंतर कुणी मारहाण केली. मारहाणीचं कारण काय होतं? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

पाऊस आणि धरणाचं पाणी सोडल्यामुळे काही महिन्यांपूर्वी पुणे जलमय झालं. पाहणीवेळी अजित पवार नसतानाही धरणातून पाणी सोडल्याचं विधान राज ठाकरेंनी केली. त्यावर सुपारीबहाद्दरानं अजित पवारांवर बोलू नये, असं उत्तर मिटकरींनी दिलं याविरोधात मनसेनं अकोल्यात मिटकरींच्या गाडीपुढे घोषणा देत वाहनावर हल्ला केला. त्या गर्दीत मनसेचा कार्यकर्ता जय मालोकार देखील होता. याच तोडफोडीनंतर अचानक मालोकारचा मृत्यू झाला. सुरुवातीला मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका सांगण्यात आलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एका झटक्यात होणार कॅन्सरचे निदान, IIT कानपुरने तयार केले डीव्हाईस एका झटक्यात होणार कॅन्सरचे निदान, IIT कानपुरने तयार केले डीव्हाईस
आता कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचे जर झटपट निदान झाले तर उपचार लवकर सुरु करता येतात आणि रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य...
मिंधे सरकार हे महिलाविरोधी सरकार, पुणे प्रकरणावरून नाना पटोले यांची टीका
मुंबईचा वंडर बॉय आणि Team India चा कर्णधार रोहित शर्मा इथेही अव्वल, विराटचा कोहलीचा विक्रम मोडला
Israel Palestine Conflict – तीन महिन्यांपूर्वी हमासच्या तीन प्रमुख नेत्यांना संपवलं, इस्त्रायलचा मोठा दावा
Central Railway Update – मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक, कळवा-मुंब्रा वासियांसाठी गुड न्यूज
मेहकर येथे शिवसेनेचा गद्दार व शासनाच्या विरोधात विक्रमी मोर्चा
आधी भाजप उमेदवारासाठी प्रचार, मग तासाभरात काँग्रेस प्रवेश