Honeymoon Photographer: हनिमूनवेळी मर्डर मिस्ट्री, नवी सिरिज येणार

Honeymoon Photographer: हनिमूनवेळी मर्डर मिस्ट्री, नवी सिरिज येणार

सध्या OTT ची चलती आहे. विविध सिरिजने प्रेक्षकांची मने जिंकत OTT प्लॅटफॉर्मकडे मोठा प्रेक्षक वर्ग वळवला आहे. यामध्ये मिस्ट्री, थ्रिलर, बोल्ड विषय अधिक चालतात. अशाच प्रकारे मर्डर मिस्ट्रीवर आधारित एक सिरिज‘हनीमून फोटोग्राफर’ लवकरच येणार आहे.

‘हनीमून फोटोग्राफर’चा ट्रेलर नुकताच प्रसारित झाला आहे. यामध्ये वराचा मृतदेह समुद्रकिनाऱ्यावर आढळल्यावर गोंधळ उडतो. आशा नेगी, साहिल सलाथिया, राजीव सिद्धार्थ आणि अपेक्षा पोरवाल मुख्य भूमिकेत आणि अर्जुन श्रीवास्तव दिग्दर्शित, ऋषभ सेठच्या ग्रीन लाइट प्रॉडक्शनने निर्मित, ही सिरिज 27 सप्टेंबर रोजी जिओ सिनेमा प्रिमिअर वर प्रदर्शित होणार आहे.

यात आशा नेगी ही हनिमून फोटोग्राफरच्या भूमिकेत आहे. जेव्हा अधीर समुद्रकिनार्यावर मृतावस्थेत आढळतो तेव्हा ट्रिप त्वरीत एक भयानक रुप धारण करते. अंबिकाला आदल्या रात्रीचे काही आठवत नाही. यामध्ये संशयाची सूई अनेकांकडे वळते. सहा पार्टमध्ये ही मालिका असणार आहे.

आशा नेगी म्हणते की, ‘माझ्या कारकिर्दीत, मी अनेक भूमिका केल्या आहेत, परंतु त्यापैकी बहुतेक रोमँटिक आणि कुटुंबकेंद्रित आहेत. मी हनीमून फोटोग्राफर निवड केली ती त्याच्या नाविन्यामुळे. सिरिजच्या नावावरून तुम्ही गृहीत धरलेल्यापेक्षा हा विषय खूप वेगळा आहे.’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एका झटक्यात होणार कॅन्सरचे निदान, IIT कानपुरने तयार केले डीव्हाईस एका झटक्यात होणार कॅन्सरचे निदान, IIT कानपुरने तयार केले डीव्हाईस
आता कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचे जर झटपट निदान झाले तर उपचार लवकर सुरु करता येतात आणि रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य...
मिंधे सरकार हे महिलाविरोधी सरकार, पुणे प्रकरणावरून नाना पटोले यांची टीका
मुंबईचा वंडर बॉय आणि Team India चा कर्णधार रोहित शर्मा इथेही अव्वल, विराटचा कोहलीचा विक्रम मोडला
Israel Palestine Conflict – तीन महिन्यांपूर्वी हमासच्या तीन प्रमुख नेत्यांना संपवलं, इस्त्रायलचा मोठा दावा
Central Railway Update – मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक, कळवा-मुंब्रा वासियांसाठी गुड न्यूज
मेहकर येथे शिवसेनेचा गद्दार व शासनाच्या विरोधात विक्रमी मोर्चा
आधी भाजप उमेदवारासाठी प्रचार, मग तासाभरात काँग्रेस प्रवेश