नवाब मलिक यांच्या जावयाचा मुंबईत भीषण अपघात; डोक्याला दुखापत, ICU मध्ये उपचार सुरू

नवाब मलिक यांच्या जावयाचा मुंबईत भीषण अपघात; डोक्याला दुखापत, ICU मध्ये उपचार सुरू

अजित पवार गटाचे नेते, आमदार नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईतील कुर्ला भागात मंगळवारी हा अपघात झाला. ANI या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर खान आणि त्यांची पत्नी निलोफर खान कुर्ला येथील क्रिटी केअर रुग्णालयात नियमित तपासणीसाठी गेले होते. यावेळी त्यांची कारचालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी (वय – 38) चालवत होता. तपासणी करून बाहेर आल्यावर समीर आणि निलोफर हे दांपत्य गाडीत बसत असताना चालकाकडून अचानक अॅक्सीलेटरवर पाय ठेवला गेला आणि गाडी एचडीआयएल वसाहतीच्या संरक्षण भिंतीजवळ जाऊन आदळली.

गाडीत बसण्याच्या तयारीत असणारे समीर हे देखील गाडी सोबत फरफटत गेले. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गोविंदासोबतच्या दुर्घटनेविषयी अरबाज खान, अर्शद वारसीची प्रतिक्रिया; म्हणाले.. गोविंदासोबतच्या दुर्घटनेविषयी अरबाज खान, अर्शद वारसीची प्रतिक्रिया; म्हणाले..
परवाना असलेल्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने मंगळवारी पहाटे अभिनेता गोविंदा जखमी झाला. गोविंदाच्या पायाला गोळी लागली असून रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्याच्यावर...
हा तर बिग बॉस सोडून इथे फिरतोय..; रितेश देशमुखच्या फोटोंवर चाहत्यांची नाराजी
कोणती मोठी सेलिब्रिटी आहे ही, काळं फासा हिला…, तृप्ती डिमरीवर का भडकली जनता, व्हिडीओ पाहिल्यानंतर बसेल धक्का
बहिणीकडून अभिनेत्याचा पर्दाफाश! दाखवला बेगमचा चेहरा, धर्म बदलून केला निकाह
भाजप सरकार शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे! प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल
आरोपींना शोधण्यास पोलिसांना अपयश, नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचा आरोप
महायुतीचे नेते स्वाभिमानी जनतेला घाबरले